सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनानंतर केंद्रीय मंत्री गडकरींचं ट्वीट, म्हणाले...

उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्यानंतर उद्योगक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

Updated: Sep 4, 2022, 05:28 PM IST
सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनानंतर केंद्रीय मंत्री गडकरींचं ट्वीट, म्हणाले... title=

Cyrus Mistry Death: उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्यानंतर उद्योगक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. पालघरमधील सूर्या नदीवरील पुलावर दुभाजकाला कार आदळून हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर मर्सिडीजचे एअरबॅग खुलले पण मिस्त्री यांच्यासोबत दोघांचा मृत्यू झाला. कारमध्ये एकूण 4 लोकं होते. या अपघातानंतर सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. निधनाच्या बातमीनंतर त्यांनी सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, "टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचे पालघर येथे झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची बातमी ऐकून खूप दुःख झाले. भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. ओम शांती."

सायरस मिस्त्री यांचा जन्म 4 जुलै 1968 रोजी झाला. शापूरजी पालोनजी ग्रुपचे प्रमुख पालोनजी मिस्त्री यांचे ते धाकटे पुत्र होते. सायरस यांनी सुरुवातीचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन शाळेतून केले. त्यानंतर सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले. लंडन बिझनेस स्कूलमधून त्यांनी मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवीही घेतली होती.