पुण्यात बेकायदा सिलिंडर साठा, स्फोटात दोन जखमी

शहरातील औंध रस्त्यावर आंबेडकर वसाहतीत गॅस सिलिंडरचा स्फोटात दोन जण किरकोळ जखमी झालेत.  झोपडपट्टीतल्या एका खोलीत २० ते २५ सिलिंडर्सचा साठा करून ठेवण्यात आला होता.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 23, 2017, 04:22 PM IST
पुण्यात बेकायदा सिलिंडर साठा, स्फोटात दोन जखमी title=

पुणे : शहरातील औंध रस्त्यावर आंबेडकर वसाहतीत गॅस सिलिंडरचा स्फोटात दोन जण किरकोळ जखमी झालेत.  झोपडपट्टीतल्या एका खोलीत २० ते २५ सिलिंडर्सचा साठा करून ठेवण्यात आला होता.

तक्रार देवूनही दुर्लक्ष

हा साठा बेकायदेशीर सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याठिकाणी कुठलीच खबरदारी घेण्यात आलेली नव्हती. स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात पुरवठा अधिकारी तसेच पोलिसांकडे तक्रारही दिली होती. मात्र काहीच कारवाई झाली नाही.

मोठा अनर्थ टळला

एका सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात दोघे जखमी झाले. ओम साई गॅस एजन्सी, रिफिलिंगचे काम चालते. सध्या २० मोठे व ८५ छोटे सिलिंडर होते. वेळीच दुर्घटना लक्षात आल्यानं त्यामुळे मोठा अनर्थ टळला. जखमींना अग्निशमन दलाचे जवान पोहोचण्यापूर्वी दवाखान्यात दाखल करण्यात आले.