मुख्यमंत्री होताच उद्धव ठाकरे करणार कर्जमाफीची घोषणा?

शेतकऱ्यांना उद्धव ठाकरेंकडून आशा... 

Updated: Nov 28, 2019, 12:25 PM IST
मुख्यमंत्री होताच उद्धव ठाकरे करणार कर्जमाफीची घोषणा? title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी कऱण्यासाठी बाहेर पडलेले उद्धव ठाकरे म्हणजे राज्यातील पहिले राजकीय नेते, औरंगाबादपासून पाहणीला सुरुवात करून त्यांनी संपुर्ण मराठवाडा पिंजून काढला, शेतक-यांसोबत संवाद साधला, आणि सातबारा कोरा करणार, सरसकट कर्जमाफी करवून घेणार असे आश्वासनही दिले, आता याच आश्वासनाची पुर्तता करण्याची वेळ आली आहे कारण उद्धव ठाकरे स्वत मुख्यमंत्री झाले आहेत.

इतकचं नाही तर ज्या बँका कर्जमाफीच्या नोटीसा पाठवतात त्यांनाही ध़डा शिकवणार असेही उद्धव म्हणाले होते.

या सगळ्यानंतर शेतक-यांच्या आशा मात्र उंचावल्या आहेत, मराठवाड्यात पावसानंच कोट्यवधींच नुकसान झालं, त्यात जाहीर झालेली मदत तुटपूंजी आहे, शिवसेनेनंही यावर टीका केलीच होती, त्यामुळं मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरेंनी पहिला निर्णय़ कर्जमाफीचा आणि शेतक-यांच्या मदतीचा घ्यावा अशीच शेतक-यांची इच्छा आहे.

आपली सरकार आली तर कर्जमाफी करु असं उद्धव ठाकरे ठणकावून सांगत होते, आता आपली सरकार आली आहे, आता तरी शेतक-यांना दिलासा मिळणार का, उद्धव तातडीनं घोषणा करणार का याकडंच मराठवाड्यासहित राज्यातील शेतक-यांच लक्ष लागलेलं आहे.