देवेंद्र जनाची नाहीतर मनाची बाळगा... उद्धव ठाकरेंनी वीजमाफीवरून फडणवीसांवर ओढला आसूड!

उद्धव ठाकरेंनी वीजबील माफीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केलीये.

Updated: Nov 26, 2022, 06:26 PM IST
देवेंद्र जनाची नाहीतर मनाची बाळगा... उद्धव ठाकरेंनी वीजमाफीवरून फडणवीसांवर ओढला आसूड!

बुलडाणा : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील चिखलीमध्ये शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. ठाकरेंनी या सभेमध्ये बोलतानां वीजबील माफीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आसूड ओढले. उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचा एक ऑडिओ क्लिप ऐकवत फडणवीसांचा दुटप्पीपणा समोर आणला. (Uddhav Thackeray criticise devendra fadnavis buldhana rally latest marathi news)

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

मध्य प्रदेश सरकारने 6500 कोटी रूपये स्वत: देऊन शेतकऱ्यांची वीजबील माफ केली आहेत. मात्र महाराष्ट्रामध्ये रोज सावकारी पद्धतीने वीजबील वसूल केली जात आहेत, असं फडणवीस ऑडिओ क्लिपमध्ये बोलत आहेत. यावर, काय बोलत होते त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. देवेंद्र जनाची नाहीतर मनाची बाळगा.... या ठिकाणी आम्हाला आनंद होत आहे की मध्य प्रदेशने शेतकऱ्यांचे वीज बील भरले आहेत. म्णणून आम्ही या ठिकाणा आम्ही फटाके फोडत आहोत ज्याचा आवाज त्या ठिकाणी जाईल. 

माझं खुलं आव्हान आहे, मी या ठिकाणी आहे तुम्ही त्या ठिकाणी करून टाका वीजबील माफ करा. मात्र वरती बसलं की वेगळी भाषा आणि खाली आलो की वेगळी भाषा असं म्हणत ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

संविधान आज सुरक्षित आहे का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. लोकशाही वाचवण्याच्या दिशेने आपली वाटचाल असली पाहिजे. काहीजण चाळी रेडे घेऊन काहीजण गुवाहटीला गेले आहेत, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी चाळीस आमदारांना (Uddhav Thackeray On Eknath Shinde) लगावला.