TYBA Exam: परीक्षा द्यायची तरी कुठे? मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना पडला प्रश्न

TYBA Exam:  मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयात 12 एप्रिल पासून पदवी परीक्षा सुरू होणार आहेत. मात्र, अद्याप विद्यापीठाकडून महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना देण्यासाठी परिपत्रक देण्यात आले नसल्याने विद्यार्थ्यांनी उद्या परीक्षा नेमक्या कोणत्या केंद्रावर द्यायची या संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.

Updated: Apr 11, 2023, 03:34 PM IST
TYBA Exam: परीक्षा द्यायची तरी कुठे? मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना पडला प्रश्न title=

Mumbai University Exam : मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. हॉल तिकीट वरून पुन्हा गोंधळ झाला आहे. बीए तृतीय वर्षाची परीक्षा (TYBA Exam) उद्या म्हणजेच 12 एप्रिल पासून सुरु होत आहे. मात्र,  विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळालेले नाहीत. यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. लवकरात लवकर हॉल तिकीट उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणी विद्यार्थी करत आहेत (Mumbai University Exam). 

मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयात 12 एप्रिल पासून पदवी परीक्षा सुरू होणार आहेत. मात्र, अद्याप विद्यापीठाकडून महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना देण्यासाठी परिपत्रक देण्यात आले नसल्याने विद्यार्थ्यांनी उद्या परीक्षा नेमक्या कोणत्या केंद्रावर द्यायची या संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.

अनेक विद्यार्थी महाविद्यालयात जाऊन या संदर्भात विचारना करत आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारचे उत्तर विद्यापीठाकडून अद्याप मिळालेला नाही. बीए तृतीय वर्षाची परीक्षा उद्या असताना विद्यार्थ्यांना हॉल तिकीट न मिळाल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत. 
युवा सेना पदाधिकारी प्रदीप सावंत यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून लक्ष घालण्याची मागणी केली आहे. 

आझाद मैदानात बार्टी विद्यार्थ्यांचे आंदोलन

मुंबईतील आझाद मैदान बार्टीचे विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत.  फेलोशिप मिळावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. अधिकारी चुकीच्या पद्धतीने माहिती मुख्यमंत्र्यांना देतात असं देखील या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. 
800 विद्यार्थ्यांपैकी काल 200 विद्यार्थ्यांची यादी रात्री उशिरा जाहीर केली आणि सकाळी लगेच 10 वाजेपर्यंत लेटर घेऊन जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  गडचिरोली चंद्रपूर येथील विद्यार्थी अचानक पद्धतीने लवकर येणार असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.  या सगळ्या संदर्भात बार्टीच्या विद्यार्थ्यांनी शरद पवारांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात यावे अशी विनंती केली आहे.  शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला मात्र बोलणे झाले नाही त्यामुळे दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी बोलून प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन विद्यार्थ्यांना दिल्याचे समजते.