निघाल्या होत्या बर्थ डे पार्टीला पोहचल्या भलतीकडेच; एकाचवेळी दोन मैत्रिणींवर सामूहिक बलात्कार

या मुलींच्या ओळखीच्या व्यक्तीनेच हे कृत्य आहे. पीडित दोन्ही मुली या अल्पवयीन आहेत. या अल्पवयीन मुलींना कोल्ड्रिंक्समधून दारू पाजून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेमुळे दोन्ही मुली अत्यंत भयभित झाल्या आहेत.

Updated: Dec 17, 2022, 07:39 PM IST
निघाल्या होत्या बर्थ डे पार्टीला पोहचल्या भलतीकडेच; एकाचवेळी दोन मैत्रिणींवर सामूहिक बलात्कार title=

जयेश जगड, झी मीडिया, अकोला : बर्थ डे पार्टीला दोन मैत्रिणींसह धक्कादायक घटना घडली आहे. एकाचवेळी दोन मैत्रिणींवर सामूहिक बलात्कार(Rape) झाल्याची धक्कादायक घटना अकोला(Akola) शहरात घडली आहे. या मुलींसह घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.  या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे(Crime News).

या मुलींच्या ओळखीच्या व्यक्तीनेच हे कृत्य आहे. पीडित दोन्ही मुली या अल्पवयीन आहेत. या अल्पवयीन मुलींना कोल्ड्रिंक्समधून दारू पाजून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेमुळे दोन्ही मुली अत्यंत भयभित झाल्या आहेत.

16 डिसेंबर रोजी या दोन्ही अल्पवयीन मुली आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजर करण्यासाठी निघाल्या होत्या. यावेळी रस्त्यातच त्यांना एक परिचयाचा तरुण भेटला. मी तुम्हाला सोडतो असं म्हणत त्याने या दोन्ही मुलींना आपल्या बाईकवर बसवलं. यानंतर या दोघींना घेऊन तो सिव्हिल पोलीस स्टेशन हद्दीतील असलेल्या एका वाटिकेत नेल. यानंतर येथे आधीच हजर असलेल्या दोन आरोपिंनी या दोन्ही मुलींना चॉकलेट आणि कोल्ड्रिंक प्यायला दिले.

कोल्ड्रिंक्स पिल्यानंतर या मुलींना गुंगी आली आणि त्यानंतर या तिन्ही युवकांनी या दोन्ही मुलींवर अतिप्रसंग केला. यानंतर मुलींनी थेट पोलिस ठाणे गाठत घडल्या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. सिव्हिल लाईन पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत तात्काळ या तिन्ही युवकांना ताब्यात घेतले. 

पोलिसांनी मुलींनी दिलेल्या तक्रारीनुसार या तिन्ही आरोपींवर पॉस्को आणि 376 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.