थंडीत पांघरुणाखाली गुदरमरून दोन भावांचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुका अंतर्गत येणा-या धोबीटोला गावात दोन सख्या भावांचा गुदमरुन मृत्यू झालाय.

Updated: Dec 27, 2017, 11:06 PM IST
थंडीत पांघरुणाखाली गुदरमरून दोन भावांचा मृत्यू  title=

गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुका अंतर्गत येणा-या धोबीटोला गावात दोन सख्या भावांचा गुदमरुन मृत्यू झालाय.

चिमुकल्यांच्या अंगावर जड पांघरुन घातल्यानं मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. मृतांमध्ये अडीच वर्षांच्या डेव्हिड पुंडे आणि नऊ महिन्यांच्या चहल पुंडेचा समावेश आहे. 

मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आलाय. मुलांना गाढ झोप लागल्यानं आणि अंगावर गादी ओढल्यानं दोघांचा गुदमरुन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवलाय. 

मात्र मोठ्या मुलाच्या तोंडातून फेस निघत असल्यानं विषबाधा झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवलाय. त्यामुळे हा विषबाधेचा प्रकार तर नाही ना असा संशय देखील व्यक्त होतोय.