Two Friends Commit Suicide : रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचं (Friendship) नातं जास्त जवळचं असतं, असं म्हटलं जातं. आनंदात असो वा नसो मात्र संकटात तुमचा मित्र कायम पाठीशी उभा असतो. आपल्या जवळचा मैत्री हा आपल्यासाठी खूप प्रेमळची व्यक्ती असते. अगदी आपल्यासाठी तो पालक (Parents), गुरु आणि वेळ प्रसंगी मोठ्या संकटात सांभाळणारा देवमाणूस असतो.
दोन जीवाभावाच्या मैत्रिणींबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे. मैत्रीणेने राहत्या घरी साडीने गळफास घेतला तिला रूग्णवाहिकेमधून रुग्णालयात घेऊन जात असताना, दुसऱ्या मैत्रीणीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारली. ही धक्कादायक घटना पुण्याजवळील (Pune)हडपसरमधील (Hadapsar) शेवाळवाडी (Shewalwadi) येथे घडली आहे. दोन बाल मैत्रिणींनी आत्महत्या (Two child friends commit suicide) केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. (Two child friends commit suicide at pune Hadapsar Shewalwadi nm)
सानिका हरिश्चंद्र भागवत (वय- 19 ) (Sanika Harishchandra Bhagwat) आणि आकांक्षा औदुंबर गायकवाड (Akanksha Audumbar Gaikwad)(वय-19 ) अशी आत्महत्या केलेल्या या दोघींची नावं आहेत. हडपसर पोलिसांकडून (Hadapsar Police) मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा भागवत आणि सारिका गायकवाड या दोघी बालपणीच्या मैत्रिणी होत्या. सात वाजण्याच्या सुमारास सारिकाने आपल्या राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
सारिकाचा मृतदेह पोलीस रूग्णवाहिकेमध्ये घेऊन जात असतानाच, आकांक्षाने पाहिलं आणि तिने त्याच इमारतीचा पाचवा मजला गाठला. पाचव्या मजल्यावरन उडी घेतली आणि ती रुग्णवाहिकेजवळ पडली. अचानक घडलेल्या घटनेमुळे एकच परिसरात एकच घबराट उडाली असून, या दोघी मैत्रींणीनी आत्महत्या का केली, याचं कारण अद्याप समजलेलं नाही.