पैशाचा पाऊस, चांगली बायको मिळावी म्हणून अघोरी पूजा

जादुटोणा करुन पैशाचा पाऊस आणि चांगली बायको मिळेल यासाठी अघोरी पुजेचा प्रकार 

Updated: Sep 27, 2018, 09:35 AM IST
पैशाचा पाऊस, चांगली बायको मिळावी म्हणून अघोरी पूजा title=

नंदूरबार : पैशाचा पाऊस आणि चांगली बायको मिळावी म्हणून नंदुरबारमध्ये अघोरी पूजा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.

जादुटोणा करुन पैशाचा पाऊस आणि चांगली बायको मिळेल यासाठी अघोरी पुजेचा प्रकार नंदुरबार शहरात उघड झाला आहे. शहराच्या मध्यवस्तीत झालेल्या या प्रकाराने खळबळ उडाली असून या घटनेप्रकरणी दोन आरोपींना पोलीसांना ताब्यात घेतले आहे. 

विशेष म्हणजे यात नरबळीचा संशय व्यक्त केल्या जात असुन तब्बल पाच युवकांना पुजेसाठी बोलवल्याचे समोर येत आहे. नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन यातील एक संशयिताला मंगळवारी रात्री आणि एका पुजाऱ्याला बुधवारी  सकाळी अटक करण्यात आली आहे.