मुंबई : मजुरांना आपापल्या गावी पोहोचविणाऱ्या अभिनेता सोनू सूदने नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. सोनू सूदच्या समाजकार्यावरुन आता विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातील मजुरांनी सोनू सूदकडे मदतीची मागणी केली. सोशल मीडियावर त्याला मदतीसाठी अनेक मेसेज येत होते. पण मदतीची मागणी करणारे हे ट्वीट अचानक डिलीट होऊ लागलेयत. त्यामुळे ट्वीटवरून मदत मागणारे हे नक्की गरजुचं होते ? की कोणी हे करवून घेत होतं ? असा प्रश्न निर्माण झालायं. सोनु सूदचे समाजकार्य, भाजप नेत्यांचा पाठींबा तसेच राज्यपालांची भेट या सर्वावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संशय देखील व्यक्त केला होता.
मी घरात अडकलोय, आमच्या कुटुंबाला गावी जायचंय असे अनेक ट्वीट सोनु सूदला आले. याला सोनुने देखील तात्काळ उत्तर दिले. मन हेलवणारे हे ट्वीट्स आणि त्याचे सोनुने दिलेले रिप्लाय होते. याचे स्क्रिनशॉट्स सोशल मीडियात व्हायरल देखील होत होते. पण यातले बरेचसे ट्वीट आता डिलीट होऊ लागलेयत. यामुळे मनात शंकेची पाल चुकचुकू लागलीय. अशा प्रकारच्या ट्वीट्समुळे सोनु सूद स्वत: देखील चिंतेत आहे.
सर्वांच्या मदतील धावणारा सोनु सूद अशी इमेज सोशल मीडियात जाणिवपुर्वक केली जात होती का ? यामध्ये राज्य सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न होता का ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सामनातील 'रोखठोक' या सदरात संजय राऊत यांनी सोनू सूदला दत्तक घेऊन भाजप नेते उत्तर भारतीय व्होटबँकेचे राजकारण करु पाहत असल्याचा गंभीर आरोप केला होता.
सोनू सूद ने ट्विटर पर जिन आईडी के ट्वीट के जवाब में मदद की और घर पहुँचने पर जिन आईडी ने थैंक्स ट्वीट किया, उनमें से ज़्यादातर आईडी अपना पोस्ट डिलीट कर चुकी हैं।
ये लोग थे या सिर्फ आईडी थे?
सोनू के इमेज मैनेजर उनके वाल की सफ़ाई करें, उससे पहले सारे स्क्रीन शॉट ले लीजिए। pic.twitter.com/gbKAYhKuQd
— Dilip Mandal (@Profdilipmandal) June 7, 2020
लॉकडाऊन काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. सूद याने म्हणे लाखो मजुरांना त्यांच्या घरी परराज्यात पोहोचवले. म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारने काहीच केले नाही. यानंतर राज्यपालांनी त्याला थेट राजभवनावर बोलावून त्याचे कौतुक केले. महाराष्ट्रातील अनेक संस्था, व्यक्ती, पोलीस, पालिका कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका आणि बँक कर्मचारी जीवावर उदार होऊन कोरोनाशी लढत आहेत. मात्र, सोशल मीडियावर त्यांचे कधी कौतुक झाले नाही. हा सगळा घटनाक्रम संशय निर्माण करणारा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनामधून टीका केल्यानंतर अभिनेता सोनू सूद यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतरही संजय राऊत यांनी सोनू सूदला खोचक टोला लगावला आहे. 'अखेर सोनु सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रयांचा पत्ता सापडला. मातोश्रीवर पोहोचले,' असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.
मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याआधी सोनू सूद याने मराठीमध्ये ट्विट केलं. 'स्थलांतरीत मजूर आणि माझं नातं खूप वर्षांपासूनचं आहे.स्थलांतरीत मजूरांसाठी केलेलं कार्य फक्त एका राज्यापुरतं मर्यादित नाही.काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ज्याने मला मदतीसाठी बोलावले त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला. प्रत्येक राज्याच्या सरकारने माझ्या या कामात सहकार्य केलं,' असं सोनू त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला.