नवरात्रोत्सवापूर्वी तुळजाभवानी देवीचा निद्राकाल सुरू

भक्तांना ७ दिवस देवीचे निद्राअवस्थेत दर्शन

Updated: Sep 23, 2019, 11:15 AM IST
नवरात्रोत्सवापूर्वी तुळजाभवानी देवीचा निद्राकाल सुरू  title=

उस्मानाबाद : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवापूर्वीचा रविवारपासून देवीचा निद्राकाल सुरू झाला आहे. रविवारपासून देवी सात दिवस निद्रा अवस्थेत असणार आहे. 

रविवारी घटस्थापनेच्या दिवशी पहाटे २ वाजता देवी सिंहासनावर विराजमान होते. आतापासून सात दिवस देवीचे निद्रा अवस्थेतील दर्शन होते. देवी जेव्हा निद्रा अवस्थेत असते, त्या काळात देखील देवीला दोन वेळा सुवासिक तेल व अत्तराने अभिषेक केला जातो. त्यानंतर नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. 

या दिवसात देशभरातून भक्त तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असतात.