पुणे : तुकाराम मुंडेंनी निलंबित केलेले १५८ कर्मचारी पुन्हा पीएमपीएलच्या सेवेत दाखल होणार आहेत. तसंच, ज्येष्ठ नागरिकांच पासमध्ये करण्यात आलेली दरवाढही मागे घेतली जाणार आहे.
पीएमपीएलच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात हे ठराव करण्यात आलं. हे दोन्ही निर्णय तुकाराम मुंडे यांनी संचालक मंडळाला विश्वासात न घेता परस्पर केले होते. तसंच, संचालक मंडळाच्या बैठकाही मुंडे घेत नव्हते, असा आरोप पीएमपीएलचे संचालक आणि पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी केलाय. मुंडे यांच्या बदलीनंतर पहील्याच बैठकीत मुंडे यांचे निर्णय फिरवण्यात आलेत.
मात्र, मुंडेच्या निर्णयाला विरोध म्हणून हे ठराव करण्यात आले नाहीत. तर, मुंडे लोकप्रतिनिधींचे ऐकत नव्हते. संचालक मंडळासमोर हे विषय येऊ देत नव्हते. त्यामुळं ते गेल्यावर निर्णय घेण्यात आल्याचं संचालक मंडळांचे म्हणणं आहे.