हवेत उडतातय असंख्य फाईल्स; तुम्ही पाहिला का जादुई दुनियेचा Video?

हा भयभीत करणारा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होतो आहे.

Updated: Oct 1, 2022, 12:49 PM IST
हवेत उडतातय असंख्य फाईल्स; तुम्ही पाहिला का जादुई दुनियेचा Video? title=
Trending Files Pune video viral on social media nm

Viral Video: उंच अशा इमारतीत (Building) अचानक सगळीकडून फाईल्स (Files) हवेत उडू लागल्या...इमारतीतील लोकांच्या डोळ्यासमोर दृष्यावर विश्वास बसतं नव्हता. क्षणात सगळीकडे हवेत असंख्य फाईल्स लोकांच्या डोक्यावर घिरक्या घालत होत्या. नेमकं काय होतं आहे याची कल्पनाही येतं नव्हती. 

हा भयभीत करणारा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होतो आहे. महादेव शंकराला (Mahadev Shankar) राग आल्यावर पृथ्वीतलावर सगळं उद्ध्वस्त झाल्याचं हे दृष्य वाटतं होतं. अनेकांना हा व्हिडीओ पाहून हॅरी पॉटरची (Harry Potter) जादूई दुनिया वाटतं होती. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे नेमकं आहे तरी काय...तर थांबा आम्ही तुम्हाला सांगतो.....

भीतीदायक आणि जादूई दुनियेचा हा व्हिडीओ पुण्यातील (Pune) आहे. पुण्यात शुक्रवारी (Friday) वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्याचा फटका पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात (Collectorate Office in Pune) पाहिला मिळाला. या कार्यालयात जणू काही हॅरी पॉटर अवतरला असं वाटतं आहे...हा व्हिडीओ पाहून असं वाटतं की त्याचं जादुचं मंत्र चुकीवर झालेली अफरातफरी आहे. (Trending Files Pune video viral on social media nm)

पाहा व्हिडीओ (नोट - जाहिरातीनंतर व्हिडीओ दिसणार)

शुक्रवारी पुण्यात वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. अचानक आलेल्या पावसामुळे कार्यालयातील महत्त्वाच्या कागदपत्राच्या फाईली अक्षरशा हवेत उडतं होत्या. कार्यालयातल उपस्थित असलेल्या लोकांना आपण जादुई दुनियेचा प्रत्यक्षात अनुभव घेतला.  हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.