पुणेकरांचं Moye Moye : फर्निचर डिस्काउंटच्या अफवेने पुण्यात ट्रॅफिक जॅम, रेट विचारून होतोय अपेक्षाभंग!

Pune Pashan Road: पुणे-मुंबई महामार्गावर पाषाण येथे अनधिकृतपणे उभारलेल्या फर्निचर मॉल, शो-रुम कारवाई झाली. पुणे बांधकाम विकास विभागाच्या वतीने जोरदार कारवाई करण्यात आली. 

Pravin Dabholkar | Updated: Dec 5, 2023, 12:24 PM IST
पुणेकरांचं Moye Moye : फर्निचर डिस्काउंटच्या अफवेने पुण्यात ट्रॅफिक जॅम, रेट विचारून होतोय अपेक्षाभंग! title=

Pune Pashan Road: सध्या मोये मोये गाण्याचा ट्रेंड सोशल मीडियात आहे. हे एक दु:ख करणारे गाणे असून अचानक ट्रेंडिंग आणि व्हायरल झालंय. लोकांनी या गाण्यावर अचानक रील्स बनवतायत. दरम्यान पुण्यातील पाषाण रोडवर प्रत्यक्षात मोये मोये पाहायला मिळत आहे. या रोडवर पुणेकरांकडून मोठ्या प्रमाणात ट्रॅफीक जॅम करण्यात आलंय. या रस्त्यांवर गाड्या आणि नागरिकांनी खूप गर्दी केली आहे. यामागचे कारण समजले तर तुम्ही देखील इथे मोये मोये झालंय, असंच म्हणाल. काय आहे हे नेमकं प्रकरण? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

पुणे-मुंबई महामार्गावर पाषाण येथे अनधिकृतपणे उभारलेल्या फर्निचर मॉल, शो-रुम कारवाई झाली. पुणे बांधकाम विकास विभागाच्या वतीने जोरदार कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे 1 लाख चौरस फुट बांधकाम पाडण्यात आले. यामध्ये दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. काही पुणेकरांनी यामध्ये संधी शोधली आहे. 

हे बांधकाम HEMRL (High Energy Materials Research Laboratory) या संरक्षण विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रात येत आहे. या फर्निचर मॉल मुळे महामार्गावर वाहतुकीचा ताण येत होता. या बाबत HEMRL कडून तक्रारी करण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली. दरम्यान फर्निचरचे मोठे दुकान पाडल्याने येथे फर्निचर स्वस्त मिळत असल्याचे अनेकांना वाटले. या रस्त्यावर फर्निचर खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. रस्त्याच्या दुतर्फा गाड्या लावून लोकं डिस्काऊंटमध्ये फर्निचर खरेदीसाठी जाऊ लागली आहेत. 

जी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी फर्निचर मॉल तोडण्यात आला. तेथे फर्निचर खरेदीसाठी लोकांनी गर्दी केल्याने वाहतूक समस्या निर्माण झाली आहे.  पाषाण रोडवर स्वस्तात फर्निचर खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली खरी पण येथे शॉपिंगला जाणाऱ्या पुणेकरांची घोर निराशा झाली आहे. 

मोठ्या प्रमाणात मागणी आल्याने दुकानदारांनी फर्निचरची किंमत कमी करण्याऐवजी वाढवली आहे. त्यामुळे फर्निचर स्वस्त होण्याऐवजी मागणी वाढल्याने किंमत अधिक झाल्याचे सांगितले आहेत. दरम्यान पाषाण रोडवरील ट्रॅफिक जॅमचे अनेक व्हिडीओ सोशल मीडिया साईट्सवर व्हायरल होत आहेत. यामध्ये डिस्काऊंटमध्ये फर्निचर घेण्यासाठी गेलेले पुणेकर निराश होऊन परतत असल्याचे दिसत आहे.