नाशिकमध्ये 'लाल चिखल'... दर घसरले!

टोमॅटोचे दर घसरल्यामुळं नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आलीय.

Updated: Feb 6, 2018, 04:43 PM IST
नाशिकमध्ये 'लाल चिखल'... दर घसरले!  title=

नाशिक : टोमॅटोचे दर घसरल्यामुळं नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आलीय.

सध्या नाशिक बाजार समितीत टोमॅटोला प्रति किलो पाच ते दहा रुपये इतका दर मिळतोय. बाजारात टोमॅटोची आवक वाढल्यामुळं टोमॅटोचे दर घसरले आहेत. 

नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी, कळवण, चांदवड आणि निफाड या तालुक्यात टोमॅटोची लागवड केली जाते. यंदाही चांगला दर मिळेल, या आशेनं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली.

मात्र, आवक वाढल्यामुळं टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. टोमॅटोच्या लागवडीला एकरी पावणे दोन लाख रुपये खर्च येतो. या पार्श्वभूमीवर सध्याचा दरामुळं शेतकऱ्यांचा झालेला खर्चही भागत नाही... त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्टपणे दिसून येतेय.