पुणे : सायबर सुरक्षेची पुरेशी यंत्रणा आपल्याकडं उपलब्ध नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. कॅशलेस व्यवहारामुळे पुण्यातील दर्शन पाटील यांना तब्बल ८७ हजार रुपयांचा भुर्दंड बसलाय.
दर्शन पाटील हे मुंबईतील एका कंपनीत सेल्स मॅनेजर आहेत. मुंबईहून स्वतःच्या चारचाकीनं ते पुण्याला येत होते. खालापूरच्या टोलनाक्यावर त्यांनी एटीएम कार्डद्वारे २३० रुपये टोल भरला. त्यानंतर घरी पोहचे र्यंत त्यांच्या खात्यामधून तब्बल ८७ हजार वजा झाल्याचा त्यांना मेसेज आला.
त्यानंतर दर्शन यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दिली. पोलिसात तक्रार देण्याबरोबरच त्यांनी बँकेतही याची माहीती दिली. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. मात्र, चार दिवस झाले तरी ना साधा गुन्हा दाखल झालाय. ना बँकेनं दखल घेतलीय.