Petrol Diesel Price on 28 December 2023: देशात महागाईचा भडका उडाला आहे. परिणामी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्व जीवनावश्यक वस्तूही महागल्या आहेत. अशातच तुम्ही जर चारचाकी किंवा दुचाकीने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत.
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहिर केले जातात. दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर जीएसटी जोडला जात नाही, तर व्हॅट राज्य सरकार जोडतो. व्हॅटमुळे प्रत्येक राज्यात त्यांची किंमत वेगळी आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे ठरवले जातात. यामध्ये उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलची किंमत मूळ किमतीच्या जवळपास दुप्पट झाली असती. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढताना दिसत आहेत. त्यानुसार आज, (28 डिसेंबर 2023) कच्चे तेल प्रति बॅरल $ 74.28 आहे. 1 बॅरलमध्ये अंदाजे 158 लिटर तेल असते.
गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलिटर दरात कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मुंबईत एक लिटर पेट्रोलचा दर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, तुमच्या जवळच्या पेट्रोल पंपावर जाण्याऐवजी तुम्ही 9224992249 किंवा आरएसपी डीलर कोड टाइप करून एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता.
शहर | पेट्रोल (प्रति लिटर) | डिझेल (प्रति लिटर) |
अहमदनगर | 106.53 | 93.03 |
अकोला | 106.73 | 93.26 |
अमरावती | 106.61 | 93.70 |
औरंगाबाद | 106.75 | 94.11 |
भंडारा | 106.69 | 93.22 |
बीड | 107.46 | 94.42 |
बुलढाणा | 108.11 | 94.29 |
चंद्रपूर | 106.10 | 93.48 |
धुळे | 106.57 | 93.20 |
गोंदिया | 107.84 | 94.05 |
हिंगोली | 107.93 | 94.18 |
जळगाव | 106.89 | 93.38 |
जालना | 108.36 | 94.28 |
कोल्हापूर | 106.63 | 93.16 |
लातूर | 107.19 | 93.74 |
मुंबई शहर | 106.31 | 94.27 |
नागपूर | 106.04 | 92.59 |
नांदेड | 108.18 | 94.65 |
नंदुरबार | 107.25 | 93.74 |
नाशिक | 106.77 | 93.27 |
उस्मानाबाद | 107.40 | 93.89 |
पालघर | 106.06 | 92.55 |
परभणी | 109.47 | 95.86 |
पुणे | 106.17 | 92.68 |
रायगड | 105.86 | 92.36 |
रत्नागिरी | 107.43 | 93.87 |
तसेच इंडियन ऑईलचे IndianOil One Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.