Corona | राज्यात दिवसभरात किती नवे कोरोनाबाधित?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे.

Updated: Jun 26, 2021, 08:37 PM IST
 Corona | राज्यात दिवसभरात किती नवे कोरोनाबाधित? title=

मुंबई : राज्याची कोरोना बाधितांची (Maharashtra Corona) आकडेवारी समोर आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. दिवसभरात एकूण 9 हजार 812 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 24 तासांमध्ये 8 हजार 752 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 179 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (today 26 june 2021 9 thousand 812 new corona patient found in maharashtra)

मुंबईत किती रुग्ण? 

मुंबईत दिवसभरात 648 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तर 1 हजार 919 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आतापर्यंत 6 लाख 92 हजार 787 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईचा रुग्ण बरे होण्याचा दर हा 96 टक्के इतका झाला आहे. तर कोरोना दुप्पटीचा दर हा 723 दिवसांवर पोहचला आहे.    

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध 
 
राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सर्व जिल्हे लेव्हल 3 मध्ये असणार आहेत. त्यामुळे कोविड ( COVID-19 pandemic) नियमांचे कठोर पालन करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे आता दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंतच खुली राहणार आहेत. तर सामान्यांसाठी लोकल प्रवास करता येणार नाही. त्यामुळे प्रतिक्षा करावी लागणार आहे.

तिसर्‍या टप्प्यातील असे आहेत निर्बंध

- अत्यावश्यक सेवेतील दुकानं सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहणार

- इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 पर्यंत सुरू राहणार

- रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेनं सकाळी 7 ते 2 सुरू राहतील 

-दुपारी 2 नंतर होम डिलिव्हरी सेवा सुरू राहिल

- मॉल्स, थिएटर बंदच राहतील

- लोकल सेवा बंदच राहिल

- सार्वजनिक मैदानं, बागा, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंगला सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत परवानगी 

- खासगी आणि शासकीय कार्यालयांत 50 टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याची परवानगी

- चित्रपट, मालिकांच्या चित्रिकरणास स्टुडिओत परावनगी

- लग्न सोहळ्याला 50 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी 

- अत्यंसंस्कारासाठी 20 लोकांना उपस्थित राहता येणार 

संबंधित बातम्या : 

राज्यात पुन्हा निर्बंध : अनलॉकचे नियम बदलले, पाहा काय सुरू राहणार, काय बंद?

Covid​​​​-19 : तिसऱ्या लाटे आधी मुलांची लस येणार? उत्पादन सुरू झाले, क्लिनिकल चाचणीची तयारी

कोरोना काळात गर्दी करण्याची वेळ सरकारने आमच्यावर आणली - देवेंद्र फडणवीस