TMC Job: ठाणे पालिकेत बंपर भरती, निवड झाल्यास 75 हजारपर्यंत मिळेल पगार

Thane Municipal Corporation Job: ठाणे महापालिका भरतीअंतर्गत विविध पदांच्या एकूण 116 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ज्युनिअर रेसिडन्सना याअंतर्गत नोकरी मिळणार आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 1, 2023, 10:20 AM IST
TMC Job: ठाणे पालिकेत बंपर भरती, निवड झाल्यास 75 हजारपर्यंत मिळेल पगार title=

TMC Job 2023: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ठाणे महानगरपालिकामध्ये बंपर भरती सुरु असून उमेदवारांना येथे चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. ठाणे महापालिकेकडून या भरतीसंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड येणार आहे.

ठाणे महापालिका भरतीअंतर्गत विविध पदांच्या एकूण 116 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ज्युनिअर रेसिडन्सना याअंतर्गत नोकरी मिळणार आहे. 

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून एम.डी. पदव्युत्तर पदवी, डी.एन.बी. पदव्युत्तर पदवी. डिप्लोमा,FCPS, एम.बी.बी.एस पदवी आणि दंतचिकित्सा बी.डी.एस. पदवीसह एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. 

निवड झालेल्या उमेदवारांना ठाणे महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे एकत्रित विद्यावेतन लागू राहणार आहे. उमेदवारांनी अर्जासोबत M.M.C/M.S.D.C चे वैध प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. हे जोडले नसल्यास अर्ज स्विकारले जाणार नाही.

राखीव संवगीतील उमेदवार उपलब्ध न झाल्यास या जागेवरील नेमणुकणीकीसाठी इतर उपलब्ध उमेदवारांची गुणानुक्रमे नेमणुक करण्यात येणार आहे. 

SEBC/EWS संवर्गातील अर्जदारास शासन निर्णयानुसार पुरावा सादर करावा लागेल. तसेच (विजा / भज, इमाव, विमाप्र या उमेदवारांनी नुतनीकरण झालेले नॉनक्रिमीलेयर प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे अन्यथा अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्या. 

ठाणे महानगरपालिकेची अधिकृत वेबसाइट www.thanecity.gov.in वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. पात्र अर्जदारांची निवड यादी महानरपालिकेच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार आहे. 

उमेदवारांकडून कोणतेही परीक्षा शुल्क घेण्यात येणार नाही. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 75 हजार 144 रुपये ते 76 हजार 587 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. 

निवड झालेल्या उमेदवारांना ठाण्यात नोकरी करावी लागेल. थेट मुलाखतीच्या माध्यमातून ही निवड केली जाईल. उमेदवारांना मुलाखतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, पहिला मजला, कळवा, ठाणे येथे उपस्थित रहावे लागेल. अर्ज अपूर्ण असल्यास तो रद्द ठरविण्यात येईल.

आयआयटी मुंबईत विविध पदांची भरती

आयआयटी मुंबईत प्रकल्प संशोधन वैज्ञानिक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांना 01 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्त केले जाणार आहे. केवळ प्रकल्पाच्या कालावधीसाठीही निवड असेल याची उमेदवारांनी नोंद घ्या. आयआयटी मुंबईच्या नोटिफिकेशननुसार, प्रोजेक्ट रिसर्च सायन्टिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मुख्यतः प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी काम करणे आवश्यक आहे. आयआयटी बॉम्बेने वरील-उल्लेखित पदासाठी फक्त 1 रिक्त जागा सोडली आहे. 

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पात्रता आणि अनुभवानुसार रु. 42,000 ते रु 84,000 (लेव्हल PR-O2) पर्यंत मासिक पगार मिळेल. निवडलेल्या उमेदवाराला "लक्ष्यित उपसंच निवड आणि सक्रिय अर्ध-पर्यवेक्षित शिक्षण वापरून भाषण ओळखण्यात निष्पक्षता" या शीर्षकाच्या प्रकल्पावर काम करावे लागेल.