तिवरे धरणाचे कंत्राटदार आमदार चव्हाण, ते देखील दोषी - ग्रामस्थ

तिवरे येथील धरणाचे काम हे खेमराज कंपनीने काम कन्स्ट्रक्शनने केले असून ही कंपनी चिपळूणचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांची आहे.  

Updated: Jul 3, 2019, 02:55 PM IST
तिवरे धरणाचे कंत्राटदार आमदार चव्हाण, ते देखील दोषी - ग्रामस्थ title=

प्रणव पोळेकर / रत्नागिरी : तिवरे येथील धरणाचे काम हे खेमराज कंपनीने काम कन्स्ट्रक्शनने केले असून ही कंपनी चिपळूणचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांची आहे. चव्हाण हे शिवसेनेचे आमदार आहेत. याठिकाणी काही ग्रामस्थांनी याबाबत आरोप केला आहे. धरण फुटण्यामागे ठेकेदार देखील दोषी आहे, त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी इथले स्थनिक करत आहेत. दरम्यान, या धरणाची जबाबदारी ही एक वर्ष कंत्राटदाराची असते. त्यानंतर संबंधित खात्याची असते, असे सांगून चव्हाण यांनी आपली जबाबदारी झटकली आहे. याप्रकरणाची चौकशी होईल, त्यातून अधिक बाहेर येईल. आपल्या भावाने हे धरण बांधले हेही आमदार चव्हाण यांनी मान्य केले आहे. आपणही धरण धोकादायक असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले होते. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप आमदार चव्हाण यांनी केला आहे.

चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे भेंडेवाडी धरण फुटले आहे. या धरणाच्या पाण्यात भेंडेवाडी १३ घरं पाण्याखाली गेली असून भेंडेवाडीतील २४ जणं बेपत्ता झालेत. दरम्यान, दहा जणांचे मृतदेह सापडलेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एनडीआरएफच्या दोन टीम तसंच पाटबंधारे विभागाचे अधिकारी घटनास्थीळी दाखल झाले आहेत. पुराच्या लोंढ्यात गुरे ढोरंही पाण्यात वाहून गेलीत. धरण फुटल्याने नजीकचा दादर पूल पाण्याखाली गेला असून ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने हाहाकार उडला आहे. या धरणाच्या पाण्यात बेंड वाडीतील १३ घरे पाण्याखाली गेली असून बेंड वाडीतील २४ जण बेपत्ता आहेत. तर दोघांचे मृतदेह सकाळी सापडले होते. तिवरे गावातील फुटलेल्या धरणात तानाजी चव्हाण आणि अजित चव्हाण या दोघांचेही कुटुंब बेपत्ता झाले आहे. दरम्यान, तिवरे धरणाची घटना कळताच इथले स्थानिक गावकरी मदतीला सर्वप्रथम धावून आले.  दरम्यान, परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.