भर दिवसा लग्न मंडपात वाघ आला आणि...

"भर दिवसा लग्न मंडपातुन जाणारा वाघ' हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल मात्र हे खरं आहे.

Updated: Dec 14, 2017, 05:06 PM IST
भर दिवसा लग्न मंडपात वाघ आला आणि... title=

भंडारा : "भर दिवसा लग्न मंडपातुन जाणारा वाघ' हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल मात्र हे खरं आहे. भंडारा जिल्ह्यातील सीमावर्ती भागात या वाघाने चांगलीच दहशत माजवली आहे. प्रथम हा नर वाघ मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील आग्री येथे आढळला होता. त्यानंतर मध्यप्रदेशातीलच  मासूलखापा या गावातील लग्न मंडपातून तो गेला.

वाघाला पाहताच गावक-यांनी मंडप सोडून पळ काढला. अनेकांनी घरावरील गच्चीवर आश्रय घेतला. एव्हढ्यावरच हा वाघ थांबला नाही तर त्यानं याच गावातील एक वास्तुशांती कार्यक्रमालाही हजेरी लावली.

मध्यप्रदेशातील या वाघाने आता महाराष्ट्रात प्रवेश केलाय. भंडा-यातील तुमसर तालुक्यात या वाघानं एका महिलेवर हल्ला करून तिला जखमी केले आहे. दरम्यान, हा वाघ शारीरिकदृष्ट्या अपंग असल्याचं वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे. वन विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय.