तलावात बुडून एकाच कुटुंबातील तीन मुलांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश

पाझर तलावातील पाण्यात बुडून एकाच कुटुंबातील तीन मुलांचा मृत्यू झाला.  

Updated: Jun 11, 2021, 12:54 PM IST
तलावात बुडून एकाच कुटुंबातील तीन मुलांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश title=

जालना : पाझर तलावातील पाण्यात बुडून एकाच कुटुंबातील तीन मुलांचा मृत्यू झाला. (Three children drown of the same family at Jalna) या घटनेनंतर कुसळ गावावर शोककळा पसरली आहे. बदनापूर तालुक्यातील मुसळी गावच्या शेतवस्तीवर ही घटना घडली. चार मुले पाण्यात उतरली होती. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडालीत. मृतांमध्ये दोन सख्ख्या बहीण भावांसह चुलत भावाचा समावेश. तर एकाला वाचविण्यात यश आले आहे.

तलावात पोहण्यासाठी ही तीन मुले पाण्यात उतरली खरी. मात्र, या मुलांना अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कुसळी गावच्या शेतवस्तीवर गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये 10 वर्षीय दीपाली वैद्य, 11 वर्षीय मनोज वैद्य आणि सात वर्षांचा अक्षय वैद्य यांचा समावेश आहे.

या शेतवस्तीवरील पाझर तलावात पावसाचे पाच ते सहा फूट पाणी साचले. या पाण्यात पोहोण्यासाठी एकाच कुटुंबातील चार भावंडे गेली होती. पण पाण्याचा अंदाज न आल्याने यातील दीपाली, अक्षय आणि मनोज यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर एकाला वाचवण्यात यश आले. या घटनेने परिसरात  हळहळ व्यक्त होत आहे. बदनापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या घटनेचा पंचनामा केला.