कोकण किनारा कचरा मुक्त करण्याचा प्रयत्न

 कोकण म्हणजे स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारा. पण गेल्या काही वर्षांपासून ही ओळख बदलते आहे. 

Updated: Sep 16, 2017, 10:48 PM IST
कोकण किनारा कचरा मुक्त करण्याचा प्रयत्न title=

प्रणव पोळेकर , झी मीडिया , रत्नागिरी : कोकण म्हणजे स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारा. पण गेल्या काही वर्षांपासून ही ओळख बदलते आहे. पर्यटकांची संख्या वाढावी आणि कोकणाचं सौंदर्यही आबाधीत रहावं यासाठी या क्लिनअप मोहीमेत अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या. 

दरवर्षी सप्टेंबरच्या तिस-या शनिवारी आंतरराष्ट्रीय सागर तट स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. समुद्राबरोबरच गोड्य़ा पाण्य़ातील स्त्रोतांचा देखील या उपक्रमात समावेश आहे... रत्नागिरीतील किनारपट्टीची स्वच्छता व्हावी यासाठी दरवर्षी किनारपट्टीवर तटरक्षक दलातर्फे हे अभियान राबवलं जातं. 

रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहूल पंडीत यांच्या हस्ते हवेत गोळीबार करुन या क्लीनअप डे चं उद्घाटन करण्यात आलं... प्रत्येकाच्या मनात आपले बीच स्वच्छ ठेवण्याची जागरुकता निर्माण झाली पाहीजे....

जगभरातील 150 देशांतील पाच लाखांहून अधिक नागरीक या उपक्रमात सहभागी होतात. गेल्या तीन दशकांत 145 दशलक्ष पौन्ड कचरा गोळा कऱण्यात आला... यामध्ये सिगारेट, अन्नाचे वेष्टन, प्लास्टीक बाटल्या, कॅरी बॅग्ज, काचेच्या बाटल्या आदि कचऱ्याचे प्रमाण समुद्र किना-यावर वाढतेय. किनारे पूर्णपणे स्वच्छ करण्यात आले. या अभियानात स्थानिक विद्यार्थी देखील सहभाग झाले होते..

समुद्र किनाऱ्यांचं संवर्धन होण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. आपले किनारे स्वच्छ ठेवण्याची प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे अशी भूमिका रत्नागिरीकरांनी आपल्या कृतीतून मांडली आहे.