कोल्हापूर : कोल्हापूरातील शास्रीनगर इथल्या एका अल्पवयीन मुलानं शेजारी राहाणाऱ्या 35 वर्षीय महिलेचा गळा चिरुन हत्या केली होती. मुलगा अल्पवयीन असल्यामुळं पोलीसांनी या मुलाची रवानगी बालसुधार गृहात केली.
पण या मुलानं केलेलं कृत्य अमानवी आहे. त्यामुळं या मुलाच्या वयाची पुन्हा एकदा शहानिशा करुन त्याला कठोरातली कोठर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आज कोल्हापूरात विविध सामाजीक संस्थाच्यावतीनं मोर्चा काढण्यात आला.
यावेळी पूजा महाडिक यांना न्याय लवकरात लवकर मिळावा,तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवावी अशी मागणी करण्यात आली.