चंद्रपूर : चालत्या खासगी बसमधल्या भाजप नेत्याच्या अश्लील कृत्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
बसमधील अश्लील कृत्याप्रकरणी नागभीड पोलिसांनी नवी कारवाई केलीय. या प्रकरणी बस चालक हेल्पर, क्लीनर सापडला. तसेच भाजप नेत्याच्या बसमधील अश्लील कृत्याप्रकरणी तिघांना अटक केली.
याप्रकरणात बसचा चालक शारंगधर रामटेके, क्लिनर राकेश खोब्रागडे आणि हेल्पर नितीन सहारे या तिघांना अटक करण्यात आली आहे. बसमधील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेय.