ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय, भयावह स्थिती

 कोरोना ( Coronavirus)  बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरी भागामध्ये असलेला कोरोना आता गावा गावात पोहोचला आहे. 

Updated: May 8, 2021, 02:04 PM IST
ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय, भयावह स्थिती title=

 वर्धा : जिल्ह्यात कोरोना ( Coronavirus)  बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरी भागामध्ये असलेला कोरोना आता गावा गावात पोहोचला आहे.जिल्ह्याच्या अनेक ग्रामीण भागात कोरोनाची स्थिती भयावह झाली आहे.कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी त्री सूत्रीवर भर देण्याचे आदेश होते मात्र आरोग्य प्रशासनाने त्याला बगल दिल्याने आता त्रिसूत्रीच ब्रेक झाल्याने कोरोनाची साखळी कशी ब्रेक होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोना रुग्णाचा आकडा दिवसेंदिवस फुगतो आहे, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 6 हजार 763 वर पोहचला आहे. 

वर्धा जिल्हा संपूर्ण राज्यात कोरोनाला थोपवून ठेवणारा पहिला जिल्हा ठरला होता.आता याच जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतो आहे. कधीकाळी शहरात असणारा हा कोरोना आता गावखेड्यातील गल्लीत पोहोचलाय. सेलू, आर्वी, हिंगणघाट  यासारख्या ग्रामीण भागात कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे.तरुणांचे होणारे मृत्यू समाज आणि यंत्रणा यांचीही झोप उडवून गेले.पण वाढत कोरोनाचा प्रमानाला जबाबदार कोण असाच सवाल उपस्थित झाला.बाजारातील गर्दीकडे प्रशासनाने बोट दाखवले त्याच वेळी मात्र टेस्टिंग , ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट या त्रि सूत्रीकडे दुर्लक्ष करण्यात आले 

 मागील महिन्याच्या सुरवातीपर्यंत जिल्ह्याच्या वेळेवेगळ्या भागात कोरोना चाचणीचे शिबिर लावण्यात येत होते.मात्र आता केवळ लक्षणे असणाऱ्यांचीच चाचणी केली जात आहे.यामुळे लक्षणे नसणारे किंवा अतिसौम्य लक्षणे असणारे रुग्ण हे सुपर स्प्रेडर ठरत आहे.आणि हेच ग्रामीण क्षेत्रात कोरोना वाढीसाठी कारणीभूत ठरत आहे. 

 मागील आठ दिवसात आढळलेले रुग्ण  

1 मे ते 7 मे पर्यंत जिल्ह्याच्या आठ तालुक्यात एकूण 5555 रुग्ण  आढळले असून 176 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

1)   वर्धा        -  2500
2)   हिंगणघाट    - 1511
3)   आष्टी          -  163
4)   कारंजा      - 189
5)   देवळी      - 685
6)   सेलू         - 187
7)   समुद्रपूर    - 144
8)   आवी       - 176
 
 जिल्ह्यात वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या नियंत्रणासाठी त्री सूत्रीवर भर देणे आवश्यक आहे.सोबतच चाचण्यांची संख्या वाढवणे,  होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांची काळजी घेणे,  ग्रामीण क्षेत्रात आरोग्य उपाययोजनेवर भर देणे, मायक्रो कंटेन्मेंट झोन घोषित करून उपाययोजना करणे यावर कारवाई करणे गरजेचे आहे. 

वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 40173 रुग्ण पोजिटिव्ह आढळले आहेत. 973 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 32437 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे तर जिल्ह्यात आता 6763 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.