मुंबई : Power outage in Mumbai Area Dadar, Matunga :शहरातील दादर, प्रभादेवीतील येथील वीज पुरवठा खंडीत झाला. जवळपास वीस ते पंचवीस मिनिटे अचनाक वीज गेली. त्यामुळे लोक उकाड्याने हैराण झाले आहेत. मुंबईबरोबरच ठाणे, डोंबिवलीत बत्ती गुल झाली होती. कळवा-पडघ्याजवळ वीज वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने याचा हा मुंबई आणि ठाण्यातील काही भागांना बसला.
राज्यात विजेचे संकट आहे. कोसळा टंचाई असल्याने विद्युत निर्मितीवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी ग्रामीण भागात भारनियमन दिसून येत आहे. राज्यावरील वीज टंचाईचं संकट दूर करण्यात काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारला काही प्रमाणात यश आले तर त्यामुळे भारनियमनामधून सुटका होईल असे वाटत असताना पुन्हा बत्ती गुल झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.
मुंबईसहीत उपनगरांमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या 400 केव्हीच्या पारेषण वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. हा बिघाड झाल्याने आज सकाळी साडेदहाच्या सुमारास मुंबई आणि ठाणे डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. कळवा पडघा येथील वीजपुरवठा केंद्रामध्ये हा बिघाड झाला आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला. दरम्यान, वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दादर येथे वीजपुरवठा सुरुळीत झाला असून अन्य ठिकाणी तो सुरळीत करण्याचे काम सुरु आहे.