डोंबिवली : अनैतिक संबंधांना पतीने विरोध केल्यान पत्नीने पोटच्या चिमुकलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनैतिक संबंधाना पतीने विरोध केल्याने पाषाणहृदयी पत्नीने संतापाच्या भरात आपल्या पोटच्या अवघ्या एक वर्षाच्या चिमुकलीला गळा दाबला. त्यानंतर मृतदेह गवतात फेकून दिल्याची घटना भोपर परिसरात घडली. याप्रकरणी निर्दयी आईला पोलिसांनी अटक केलेय.
स्वत:च्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात निर्दयी आई विरोधात गुन्हा करण्यात आलाय. दरम्यान, मुळचे उत्तरप्रदेशचे असणारे ननकण प्रसाद आणि त्यांची पत्नी हे दाम्पत्य आपल्या वर्षाच्या मुलीसोबत डोंबिवली पूर्वेकडील भोपर येथील विठाबाई चाळीत राहत होते. प्रसाद यांच्या पत्नीचे अनैतिक सबंध असल्याची कुणकुण ननकण याला लागली होती. त्यातून या दोघांमध्ये अनेकदा वाद झाला होता. अनैतिक सबंधाना विरोध केल्याने पत्नी संतापली होती. संतापाच्या भरात पत्नीने काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तिच्या पोटच्या १ वर्षाच्या चिमुकलीचा गळा दाबून हत्या केली.
हे कृत्य कुणाला माहीत पडून नये म्हणून तिने चिमुकलीचा मृतदेह मोकळ्या जागेत वाढलेल्या गवतात फेकून दिला. हा प्रकार ननकण यांच्या लक्षात येताच त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी पत्नी विरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे.