पुण्यातील गडकिल्ले पर्यटकांसाठी खुले, पाळावे लागणार 'हे' नियम

पुण्यातील गडकिल्ले पर्यटकांसाठी खुले

Updated: Nov 2, 2020, 09:14 AM IST
पुण्यातील गडकिल्ले पर्यटकांसाठी खुले, पाळावे लागणार 'हे' नियम title=

पुणे : कोरोना संकटकाळात नागरिरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पुणे जिल्ह्यातील गड किल्ले आजपासून पर्यटकांसाठी तसेच गिर्यारोहकांसाठी खुले झाले आहेत. गड-किल्ल्यावर सह डोंगर कड्यांवर भटकंतीस तसेच ट्रेकिंगसाठी जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी काही नियमांचं पालन करावं लागणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गड-किल्ल्यांवर प्रवेश बंदी करण्यात आली होती. मात्र आता सर्वत्र लॉक डाऊन शिथिल झालं आहे. शहरांतील बाजारपेठा, मैदाने, उद्याने तसेच बागा देखील उघडल्या आहेत. अशा परिस्थितीत गड किल्ल्यांचे दरवाजे उघडण्याची मागणी होत होती. जिल्हा प्रशासनाने ती मान्य केली आहे.

पर्यटन तसेच ट्रेकिंगसाठी नियम

-एका ग्रुप मध्ये पंधरा पेक्षा जास्त सदस्य नसावेत
- मास्क चा वापर बंधनकारक
- 10 वर्षांच्या आतील तसेच 65 वर्षांच्या वरील व्यक्तींना परवानगी नाही
- सोशल डिस्टनसिंग पाळणे आवश्यक