मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विन्सची डिमांड वाढली; गुजरातसह अनेक राज्यांनी केली पेंग्विन्स देण्याची मागणी

मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विन्सची मागणी देशभरातून वाढली आहे. 

Updated: Feb 29, 2024, 11:33 PM IST
मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विन्सची डिमांड वाढली; गुजरातसह अनेक राज्यांनी केली पेंग्विन्स देण्याची मागणी title=

Humboldt Penguins Byculla zoo : मुंबईतील राणीच्या बागेतील (Rani Baug Byculla)  पेंग्विन्सची ( Penguins) देशभरातून डिमांड वाढलीय. राणीच्या बागेतील पेंग्विन्स मिळावेत यासाठी ओडिशा, गुजरात, लखनऊ, गोरखपूर इथल्या झू प्राधिकरणांनी पत्रव्यवहार केला आहे. राणीच्या बागेत एकूण 15 पेंग्विन्स आहेत. यापैकी काही पेंग्विन्स मिळावेत अशी मागणी इतर राज्यातील प्राणीसंग्रहालयातून करण्यात आलीय. दुसरीकडे पेंग्विनच्या बदल्यात लांडगा, तरस, हायना आणि सिंह असे प्राणी मिळावेत अशी मुख्य मागणी मुंबई महापालिकेनं केली.

दक्षिण मुंबईच्या भायखळा विभागात 60 एकर जागेत राणीची बाग पसरलेली आहे. पेंग्विनसह देश विदेशातील प्राणी पक्षीही राणीच्या बागेत पहायला मिळतात. त्यांच्या नैसर्गिक राहण्याच्या पद्धतीने त्यांना इथं ठेवण्यात आलं आहे. देश विदेशातील 100 विविध पक्षी पर्यटकांना इथं जवळून न्याहाळता येते. तर बिबटया, अस्वल, कोल्हा, तरस, कासव यांचंही दर्शन इथं मुंबईकरताना मिळते. पक्षांसाठी तब्बल पाच मजली एवढं मुक्त पक्षी विहार बांधण्यात आले आहे.  प्राण्यांसाठी काचेची दालन उभारण्यात आली आहेत. राणीच्या बागेसाठी प्रवेश शुल्क आकारले जाते. तसेच पेंग्विन्स पहाण्यासाठी देखील शुल्क आकारले जाते. यातून मुंबई महापालिकेला मोठा महसुल प्राप्त होतो. 

राणीच्या बागेची ऑनलाईन सफर 

मुंबईची ओळख असलेली राणीची बाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाची आता ऑनलाईन सफर करता येणार आहे,  प्राणिसंग्रहालयाच्या वतीनं ‘द मुंबई झू’ या यूटय़ूब चॅनलद्वारे या सफरीत सामील होता येणारे. 'द व्हच्र्युअल टूर ऑफ राणी बाग’ असं या सिरिजच नाव असून या माध्यमातून राणी बागेचा 160 वर्षांचा इतिहास पाहता येणार आहे.