पुणे : चोरट्यांनी चोरीच्या बहाण्याने ATMमध्ये स्फोट घडवून आणला.( ATM Blast) चाकण येथे ATMमध्ये रात्री अचानक स्फोट ATM Blast) झाल्याने एकच धावपळ उडाली. एटीएमच्या खोलीच्या दरवाजाच्या काचा आणि पत्रे लांबपर्यंत उडून गेलेत, एवढा मोठा स्फोट होता. चाकण औद्योगिक वसाहत परिसरातील ही घटना घडली. (The blast place at an ATM at Chakan in Pune)
चाकण औद्योगिक वसाहत परिसरातील भांबोली फाटा येथे चोरट्यांनी चोरीच्या बहाण्याने ATM मशिनचा स्फोट केला असून मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास हिताची कंपनीच्या ATM मशिनमध्ये चोरट्यांनी स्फोट करत ATM मशिन फोडली आहे.
हिताची बँकेच्या ATM चा अचानक स्फोट झाला. या स्फोटात ATM सह समोरील काचांचा चक्काचूर झाला आहे. स्फोटाचे कारण मात्र अस्पष्ट आहे. दरम्यान, जीवीत हानी टळली. स्फोटाची माहिती मिळताच महाळुंगे पोलीस घटनास्थळी दाखल दाखल झाले आहेत.
स्फोटात ATM मशिनचा अर्धा भाग फुटला असून काचांचा चक्काचूर झाला आहे. स्फोटात ATM मशिनमधील काही रक्कम बाहेर फेकली गेली. तर काही रक्कमही न फुटलेल्या अर्धांभागात सुरक्षित राहिली आहे. परंतु यात एकूण किती रक्कम चोरीला गेली हे अद्याप समजू शकले नाही.
ATM चोरीच्या वाढत्या घटनांनी ATM सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून या ATM ला CCTV कॅमेरे सह सुरक्षा रक्षकही तैनात नसल्याने ATM फोडीच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यामुळे ATM चोरीच्या वाढत्या घटनांनी मात्र पोलिसांसमोर गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान वाढले आहे.