मुंबई : दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये ठाण्यातील 9 पर्यटकांवर काळानं घाला घातला आहे. नेपाळमधील विमान दुर्घटनेमध्ये ठाण्यामधील अशोक त्रिपाठी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चौघेजण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. (Thane Tourist Death in different accident nepal plane crash )
नेपाळच्या तारा एअरलाईन्सचं विमान रविवारी बेपत्ता झालं. ज्यानंतर या विमानाचे अवशेष मस्तंगच्या कोवांग गावात सापडले. या विमानात 22 प्रवासी होते. ज्यामध्ये त्रिपाठी कुटुंबियांचाही समावेश होता अशी माहिती समोर आली आहे.
नेपाळमध्ये नेमकं काय घडलं?
रविवारी सकाळी, तारा एअरलाइन्सच्या 9 NAET डबल-इंजिनयुक्त विमानात 4 भारतीय आणि 3 जपानी नागरिकांसह 22 प्रवासी होते. या विमानाचे पोखरा ते जोमसोमसाठी सकाळी 9.55 वाजता उड्डाण केले होते. विमान मस्तंगला पोहोचताच संपर्क तुटला.
एकिकडे नेपाळमधील विमान दुर्घटनेनं ठाणेकर हादरले असतानाच, दुसरीकडे सिक्कीममध्ये झालेल्या दुर्घटनेत पुनमिया कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पर्यटनासाठी सिक्किमला केलेल्या या कुटुंबाची कार दरीत कोसळली.
अपघात इतका भीषण होता, की त्यामध्ये पुनमिया कुटुंबासह त्यांचे एक निटवर्तीय आणि स्थानिक कार चालकाचा मृत्यू झाल्याची हादरवणारी बातमी समोर आली.
ठाण्यातील कुटुंबांवर नियतीचा हा आघात पाहून सर्वांचंच काळीज पिळवटत आहे.