मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात गुन्हेगारांवर धाक आहे का? इमारतीत घुसून महिलेचा विनभंग... CCTV

यांची हिम्मत होतेच कशी? दिवसाढवळ्या इमारतीत घुसून महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला  Mumbra Police ने केली अटक

Updated: Dec 10, 2022, 04:29 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात गुन्हेगारांवर धाक आहे का? इमारतीत घुसून महिलेचा विनभंग... CCTV title=
प्रतिकात्मक फोटो

Thane Crime News : ठाण्यातील मुंब्र्यात (Thane Mumbra) गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच नसल्याचं दिसतंय. इमारतीत घुसून 19 वर्षीय तरुणाने महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. पीडित महिला मार्केटमधून आपल्या मुलीसोबत घरी चालली होती. घराचा दरवाजा उघडत असताना आरोपी तिच्या जवळ आला आणि विनयभंग करून पळून गेला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला. महिलेनं तक्रार करताच मुंब्रा पोलिसांनी (Mumbra Police) सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला 24 तासाच्या आतच अटक केलीय. 

पोलिसांनी असा लावला शोध
अकिब युसुफ काश्मिरी असं या या आरोपीचं नाव असून, त्याला न्यायालयात हजर करून पुढील कारवाई केली जातेय.पण, इमारतीत घुसून महिलेचा विनयभंग करण्याची हिंमत होतीच कशी...? गुन्हेगारांना कायद्याची भीती नाही का...? असे सवाल उपस्थित होतायत. महिलेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी काही पथकांची नेमणूक केली तसंत परिसरातील सीसीटीव्हींचा तपास केला. यानंतर काही तासातच पोलिसांनी आरोपीचा शोध लावला. आरोपी अकिब युसुप हा मुंब्रा इथल्या अमृत नगरमध्ये रहातो.

अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा
दरम्यान, एका अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार करणाऱ्या तीन आरोपींना 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2014 मध्ये तीन आरोपींनी 15 वर्षांच्या मुलीला फूस लावून पळवून नेलं आणि त्यानंतर तिघांनी त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) बारांबाकी जिल्ह्यात ही घटना घडली होती. 

हे ही वाचा : Maharashtra Politics : मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडच्या खात्यांची जबाबदारी विविध मंत्र्यांकडे सोपवली

100 जणांच्या टोळीने मुलीचं केलं अपहरण
 तेलंगणातील हैदराबादमध्ये शुक्रवारी 100 तरुणांच्या जमावाने जबरदस्तीने एका घरात घुसून एका 24 वर्षीय तरुणीचे अपहरण (Telangana Dentist's Kidnap) केल्याचा प्रकार समोर आलाय. या तरुणीचा शुक्रवारी साखरपुडा होणार होता. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तासाभराच्या शोधानंतर पोलिसांनी तरुणीचा सुखरूप सुटका केली असून काही आरोपींना अटकही करण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलिसांनीही गुन्हा दाखल केला आहे.