Maharashtra Political News : कोल्हापुरात (Kolhapur) ठाकरे गटाच्या (Thackeray Group) शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने ( MP Darishsheel Mane ) यांची गाडी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अडवली. 'साहेब गद्दारी का केली? शिवसेनेत 6 महिने हेरगिरी करायला आला होतात का? अशा शब्दांत शिवसैनिकांनी खासदार माने यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदूर इथं ही घटना घडली. यावेळी बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना रोखले, त्याचबरोबर ठाकरे गटाच्या आक्रमक कार्यकर्त्यांना बाजूला केले.
दरम्यान, ठाकरे गटाने कोल्हापूर जिल्ह्यावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. कोल्हापुरात ठाकरे गटाची चांगली ताकत आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत कोल्हापूर दौरा केला. त्यात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद सांधला. तर जिल्ह्यातील दोन्ही खासदार जे शिंदे गटात गेले त्यांच्यावरही जोरदार टीका केली. तर खासदार धैर्यशील माने यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. माने यांनी ‘मीच खासदार’ टॅगलाईन बदलून आता ‘मीच गद्दार’ करावी असे राऊत यांनी टीका करताना म्हटले होते.
त्यानंतर आज चंदूर येथे कार्यक्रमानिमित्त खासदार धैर्यशिल माने जात असताना त्यांचा ताफा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अडवला. साहेब गद्दारी का केली? असा सवालही करत काळे झंडे दाखवले. यावरुन हातकणंगलेमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर खासदार माने यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कितीही विरोध झाला तरी काम करत राहणार आहे. आपण कामातून उत्तर देऊ असे म्हटले आहे.
दरम्यान, शिवेसना फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कमालीचे सक्रीय झाले आहेत. ठाकरे यांच्या महाराष्ट्रात मॅरेथॉन जाहीर सभा होणार आहेत. (Uddhav Thackeray Sabha) कोकणताली खेडनंतर येत्या 26 मार्चला मालेगावात सभा होईल. शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात ठाकरे यांच्या सभा होत आहे. ठाकरे गट अधिक आक्रमक झाला असून राज्यात पुन्हा सत्ता आणण्याचा निर्धार केला आहे. कोल्हापूर, पुणे , मुंबई, नाशिक, कोल्हापूर , अमरावती या ठिकाणी कार्यक्रमाच्या तारखा पंधरा तारखेला आम्ही जाहीर करु. एप्रिल महिन्याच्या 2 तारखेपासून सगळ्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्ररित्या 10 जूनपर्यंत महाविकास आघाडीच्या सभा एकत्र घेण्याचा निर्णय झालेला आहे. यामध्ये माननीय शरद पवार उद्धव ठाकरे,. जयंत पाटील इत्यादी नेते उपस्थित असतील, अशी माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.