Uddhav Thackeray Sabha : पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) चांगले यश मिळाल्यानंतर आघाडीत मोठी उत्साह आहे. (Maharashtra Political) दरम्यान, शिवेसना फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कमालीचे सक्रीय झाले आहेत. ठाकरे यांच्या महाराष्ट्रात मॅरेथॉन जाहीर सभा होणार आहेत. कोकणताली खेडनंतर येत्या 26 मार्चला मालेगावात सभा होईल. शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात ठाकरे यांच्या सभा होत आहे. ठाकरे गट अधिक आक्रमक झाला असून राज्यात पुन्हा सत्ता आणण्याचा निर्धार केला आहे. (Maharashtra Political News)
कोल्हापूर, पुणे , मुंबई, नाशिक, कोल्हापूर , अमरावती या ठिकाणी कार्यक्रमाच्या तारखा पंधरा तारखेला आम्ही जाहीर करु. एप्रिल महिन्याच्या 2 तारखेपासून सगळ्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्ररित्या 10 जूनपर्यंत महाविकास आघाडीच्या सभा एकत्र घेण्याचा निर्णय झालेला आहे. यामध्ये माननीय शरद पवार उद्धव ठाकरे,. जयंत पाटील इत्यादी नेते उपस्थित असतील, अशी माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.
दरम्यान, महाविकास आघाडी राज्यात सभा घेणार आहे. एप्रिल - मे महिन्यात प्रत्येक जिल्हात महाविकास आघाडीच्या एकत्र सभा होणार आहेत. नागपूर, पुणे, कोल्हापूर येथे प्रामुख्याने सभा होणार आहेत. उदधव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यासह प्रमुख नेते सभेला उपस्थितीत राहणार आहेत. तसेच अर्थसंकल्प अधिवेशन कालावधीत मुंबईत महाविकास आघाडी पक्षाचे प्रमुख जिल्हा पदाधिकारी यांचा ही मेळावा एकत्र होणार आहे. याबाबत महाविकास आघाडी नेत्यांच्या बैठकीत निर्णय आहे.
महाविकास आघाडी नेत्यांची 15 मार्च मुंबई वायबी चव्हाण सेंटर येथे दुपारी दोन वाजता मेळावा होणार आहे. महाविकास आघाडी तीन पक्षाचे जिल्हा प्रमुख पदाधिकारी बैठक हजर राहणार आहे. महाविकास आघाडी सभाची सुरुवात छत्रपती संभाजी नगर येथून होणार, 2 एप्रिलला सभा, सभेच्या नियोजन जबाबदारी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, एनसीपी आमदार सतीश चव्हाण यांच्याकडे, नागपूर, पुणे, कोल्हापूर, परभणीत सभा होणार आहे.
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा होणार आहेत. या सभेला उद्धव ठाकरे यांच्यासह अजित पवार आणि इतर नेते उपस्थित राहणार आहेत. 15 तारखेला होणाऱ्या बैठकीत सभेची मैदाने यावर चर्चा होईल, असे आघाडीकडून सांगण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर - अंबादास दानवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
पुणे - अजित पवार, राष्ट्रवादी
कोल्हापूर - सतेज पाटील, काँग्रेस
मुंबई - आदित्य ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
नाशिक - छगन भुजबळ, राष्ट्रवादी
नागपूर - सुनील केदार, काँग्रेस
अमरावती - यशोमती ठाकूर काँग्रेस