मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पुन्हा राडा, ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाकडून मारहाण

Thane Crime News :  ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार मारहाण झाली आहे. यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाकडून मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. रोशनी शिंदे या ठाकरे गटाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्या आहेत. ठाकरे गटाने मध्यरात्री कासारवडवली पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन केले, त्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली. गुन्हा नोंदवला नाही.

Updated: Apr 4, 2023, 08:33 AM IST
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पुन्हा राडा, ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाकडून मारहाण title=

Thane Crime News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार मारहाण झाली आहे. यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिका-याला शिंदे गटाकडून मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय. रोशनी शिंदे या ठाकरे गटाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्या आहेत. मात्र फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत शिंदे गटाने रोशनी शिंदे यांना मारहाण केली. ही संपूर्ण मारहाण सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे. ठाकरे गटाने मध्यरात्री कासारवडवली पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन केले, त्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली. मात्र अजून एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. रोशनी शिंदे यांला उपचारासाठी खासगी रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.

दरम्यान, याआधी मुख्यमंत्री शिंदे यांच्याविषयी सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्याने ठाण्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला तीन जणांनी मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. मारहाण करणारे शिंदे गटाचे पदाधिकारी असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या मारहाणीनंतर एक व्हिडिओ ट्विट केलाय. ‘हे सगळे मी गेले तीन वर्ष अनुभवतो आहे आणि मागचे 35  दिवस तर सगळ्या मर्यादा पार’ असे म्हणत राज्य शासनाविरोधात टीका केली.  

मारहाण झालेले गिरीश कोळी हे ठाण्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. गुरुवारी गिरीश कोळी यांना तीन जणांनी मारहाण केली होती. या मारहाणीनंतर ठाणे शहरातील राजकीय वातावरण तापले होते. शिवसेनेचा उपविभागप्रमुख बंटी बाडकर आणि त्याचे सहकाऱ्यांनी कोळी यांना मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.