'ठाकरेज कॅट स्नेक', तेजस ठाकरेंकडून सापाच्या नव्या प्रजातीचा शोध

 आता तेजसनं एका सापाची दुर्मिळ प्रजात शोधली आहे.

Updated: Sep 28, 2019, 10:53 AM IST
'ठाकरेज कॅट स्नेक', तेजस ठाकरेंकडून सापाच्या नव्या प्रजातीचा शोध title=

मिलिंद आंडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, वर्धा : उद्धव ठाकरे यांचे सूपुत्र तेजस ठाकरे यांनी पश्चिम घाटात मांजऱ्या सापाची एक दुर्मिळ जात शोधून काढली आहे. या सापाच्या शोधात दिलेल्या योगदानामुळे या सापाला ठाकरेज कॅट स्नेक असं नाव देण्यात आले आहे. 

ठाकरे घराण्यातील प्रत्येक सदस्याच्या अंगी वेगळा गुण आहे. बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार होते. उद्धव ठाकरे छायाचित्रकार आहेत. तर आदित्य ठाकरे हे कवी आहेत. आदित्य ठाकरेंचा लहान भाऊ तेजस ठाकरे हा वन्यजीवप्रेमी आहे. तेजसनं पश्चिम घाटात एक दुर्मिळ खेकड्याची जात शोधली होती. आता तेजसनं एका सापाची दुर्मिळ जात शोधली आहे.  आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरूनही याची माहीती दिली होती.

कॅट स्नेक किंवा मांजऱ्या साप अशी ओळख असलेल्या या सापाची एक वेगळीच प्रजाती तेजस ठाकरेंनी शोधलीय. मांजऱ्या सापाच्या वर्गातील या सापाबाबत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री ऑफ सोसायटीच्या पत्रिकेत एक शोधनिबंध प्रसिद्ध झाला. तेजस ठाकरेंच्या पुढाकारातून शोधण्यात आलेल्या या सापाला ठाकरेज कॅट स्नेक असं नाव देण्यात आल्याची माहीती वन्यजीव अभ्यासक  पराग दांडगे यांनी दिली आहे.

तेजस ठाकरेंनी २०१५ साली पश्चिम घाटात हा साप पाहिला होता. तेजसनं या सापाचा सविस्तर अभ्यास केला. तो मांजऱ्या साप असला तरी इतरांपेक्षा वेगळा कसा आहे हे स्पष्ट केले. त्यामुळे ठाकरे घराण्याचे नाव आता या सापाला मिळाले आहे.