माळशेज घाटात एसटी बसचा भीषण अपघात; 15 प्रवासी थोडक्यात बचावले

ठाण्याच्या मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात एसटी बस आणि टेम्पोचा अपघात झाला, यात 15 जण किरकोळ जखमी झाले. मात्र सुदैवाने जीवितहानी टळली.

वनिता कांबळे | Updated: May 29, 2023, 07:23 PM IST
माळशेज घाटात एसटी बसचा भीषण अपघात; 15 प्रवासी थोडक्यात बचावले title=

Malshej Ghat ST Bus Accident:  माळशेज घाटामध्ये (malshej ghat) एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. एसटी बस आणि टेम्पोची धडक होवून हा अपघात झाला आहे.  या अपघातात 15 प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर माळशेज घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. 

ठाण्याच्या मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात एसटी बस आणि टेम्पोचा हा अपघात झाला, यात 15 जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बस कल्याणवरुन आळेफाट्याच्या दिशेने एसटी बस जात होती. या एसटी बसने माळशेज घाटामध्ये ट्रकला जोरदार धडक दिली. सावरणे वळणावर या दोन्ही वाहनांची धडक झाली.  या अपघातात बसमधील 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये ट्रक आणि एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर वाहतूक पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तातडीने मदतकार्य राबवण्यात आले.

बाईकच्या धडकेत महिलेचा मृत्यू 

पुण्यात भरधाव वेगात आलेल्या बाईकच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आला आहे.पुण्याच्या कर्वेनगरमध्ये ही घटना घडलीय. अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला. रंजना वसवे असं महिलेचं नाव असून, त्या जात असताना भरधाव वेगात बाईकस्वार आला. वेगावर नियंत्रण नसल्याने त्याने महिलेला जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती, त्यात महिला गंभीर जखमी झाली. तिच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांकडून बाईकस्वारावर कारवाई करण्यात आली. पुण्यात विना हेल्मेट, भरधाव वेगात गाड्या चालवण्याचे प्रकार वाढलेयत. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, भरधाव वेगात गाड्या चालवणा-यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

पाली खोपोली मार्गावर दुचाकीला भीषण अपघात

पाली खोपोली मार्गावर मोटार सायकलला झालेल्या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला. ओमकार देशमुख, ऋषिकेश लोखंडे आणि यश चव्हाण अशी त्यांची नावे आहेत. हे तिघेजण मोटार सायकलवरून प्रवास करीत असताना वजरोली गावाजवळ त्यांची मोटार सायकल संरक्षक कठड्यावर आदळली. दोघांचा रस्त्यावर डोके आपटून गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.