साताऱ्यात बॅनरवरुन राजकीय वातावरण तापले

एका बॅनरवरुन वातावरण चांगलेच तापले आहे. (Tension over banner tearing in Satara)  

Updated: Jan 9, 2021, 02:27 PM IST
साताऱ्यात बॅनरवरुन राजकीय वातावरण तापले  title=

सातारा : येथे एका बॅनरवरुन वातावरण चांगलेच तापले आहे. (Tension over banner tearing in Satara) राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी काल अचानक सर्वांना धक्का देत शहरात उभारलेल्या ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन केले. प्रवेशद्वारावर छत्रपती संभाजी महाराज असा फलक लावण्यात आला होता. मात्र, हा फलक रात्री अज्ञात व्यक्तीने फाडल्याने वातावरण चांगलेच तापले असून तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

पोवईनाका भागात तणावाची परिस्थीती निर्माण झाली. त्यामुळे पोलिसांनीही पोलीस बंदोबस्त वाढवला. उदयनराजे समर्थकांनी या घटनेचा निषेध करत मूक मोर्चा काढला. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा फलक लावण्यात आला. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या घटनेच्या तपासाचे आदेश दिल्यानंतर तणाव निवळला. 

पाहणी करण्यासाठी आलेल्या उदयनराजे भोसले यांनी काल अचानक सर्वांना धक्का देत सातारा शहरात उभारलेल्या ग्रेड सेपरेटर उदघाटन केले होते. या ग्रेड सेपरेटरच्या एका प्रवेशद्वारावर छत्रपती संभाजी महाराज असा फलक लावण्यात आला होता. रात्री कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी हा फलक फाडला आहे. त्यामुळे पोवईनाका भागात उदयनराजे भोसले प्रेमी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला आहे. पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले आणि येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असून तणावाखाली आहे.