टेम्पो - ट्रॅक्टर अपघातात पाच वारकरी ठार

पंढरपूरला जात असताना टेम्पो आणि ट्रॅक्टरमध्ये झालेल्या अपघातात पाच वारकरी ठार झाले आहेत 

Updated: Nov 8, 2019, 09:03 AM IST
टेम्पो - ट्रॅक्टर अपघातात पाच वारकरी ठार  title=

सांगोला : कार्तिकी एकादशीनिमित्त बेळगावहून पंढरपूरला जात असताना टेम्पो आणि ट्रॅक्टरमध्ये झालेल्या अपघातात बेळगाव तालुक्यातील मंडोळी गावातील पाच वारकरी ठार झाले आहेत. शुक्रवारी पहाटे चार वाजता सांगोल्याजवळील मांजरी येथे हा अपघात घडला आहे. या घटनेत दोघे जण गंभीर असून इतर जखमींवर सांगोला आणि पंढरपूर येथे उपचार सुरू आहेत.

बेळगाव तालुक्यातील मंडोळी गावातील लोक खासगी टेम्पोमधून कार्तिकी एकादशी निमित्त विठोबाच्या दर्शनासाठी जात होते वाटेतच त्यांच्यावर काळाने झडप घातली. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. मृतांत हंगरगा येथील एक तर मंडोळी येथील चौघांचा समावेश आहे.

सध्या पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. या घटनेनंतर बेळगावातील मंडोळी गावावर शोककळा पसरली आहे. मंडोळी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष गावकरी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत.