Crime News : देवाचे डोळे काढले... काय धाडस म्हणायचे या चोरांचे?

Crime News : जळगाव मधील मुधाई देवीचे मंदिर हे अतिशय प्राचीन आहे. अनेक भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे मंदिरात घडलेल्या चोरीच्या प्रकारामुळे भाविकांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

Updated: Mar 21, 2023, 10:51 PM IST
Crime News : देवाचे डोळे काढले... काय धाडस म्हणायचे या चोरांचे? title=

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : सर्वत्र चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. जळगाव मध्ये चोरट्यांचा पराक्रम पाहून पोलिसही हादरले आहेत. चोरट्यांनी थेट देवाचे डोळे काढले आहेत. जळगाव मधील प्राचीन मंदिरातील देवीच्या मूर्तीचे चांदीच्या डोळ्यांची चोरट्यांनी चोरी  केली (Crime News). 

चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील प्राचीन मुधाई देवीच्या मंदिरात ही चोरीची घटना घडली आहे. मुदाई देवीच्या मूर्तीचे चांदीचे डोळे अज्ञाताने चोरी केले आहेत. या घटनेमुळे वाघळी गावात खळबळ उडाली आहे. 
जळगाव मधील मुधाई देवीचे मंदिर हे अतिशय प्राचीन आहे. अनेक भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे मंदिरात घडलेल्या चोरीच्या प्रकारामुळे भाविकांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्ती झीज

करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्ती संदर्भात पालकमंत्री दीपक केसरकरांनी मंदिरात पाहणी केली. त्यानंतर मूर्तीची होत असलेल्या झीजबाबत काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. झी 24 तासने इन्वेस्टीगेटिव्ह रिपोर्ट करून देवीच्या मूर्तीच्या परिस्थिती संदर्भात वास्तव मांडलं. या रिपोर्ट नंतर राज्य आणि केंद्रीय पुरातत्त्व विभागाने तातडीने अंबाबाई देवीच्या मूर्तीची पाहणी केली. त्यानंतर आता कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर अंबाबाई मंदिरात दाखल झाले. अंबाबाईची मूर्ती मोठ्या प्रमाणात झिजली असल्यामुळे तिचे अनेक भाग निखळत चालले आहेत. त्यामुळे तिचे संवर्धन, संरक्षण व्हावं याच उद्देशाने 24 तासने इन्वेस्टीगेटिव्ह रिपोर्ट करून अंबाबाईची मूर्ती संदर्भातली माहिती सर्वप्रथम जगासमोर आणलं. मात्र, यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या आदेशानुसार सचिव शिवराज नाईकवाडे यांना सचिव पदावरून हटवण्यात आलं. तर, माध्यम प्रतिनिधींच्या कॅमेरामनना मंदिरात जाण्यापासून रोखलं आहे...यामुळे केसरकर येताच पत्रकारांनी घेराव घालून नाराजी व्यक्त केली.