तलाठी भरतीचे आधीच 1 हजार अर्ज शुल्क त्यात परीक्षा केंद्रावरही विद्यार्थ्यांची वेगळी लूट

सर्व्हर डाऊन झाल्याने राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर तलाठी भरती परीक्षा उशीराने सुरु झाल्या. आधीच दूरवरचे परीक्षा केंद्र आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. त्यात आता  परीक्षा केंद्रावर बॅग आणि मोबाईल ठेवण्यासाठी पैसे आकारल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 21, 2023, 11:28 AM IST
तलाठी भरतीचे आधीच 1 हजार अर्ज शुल्क त्यात परीक्षा केंद्रावरही विद्यार्थ्यांची वेगळी लूट title=

Talathi Recruitment: सर्व्हर डाऊन झाल्याने राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर तलाठी भरती परीक्षा उशीराने सुरु झाल्या. आधीच दूरवरचे परीक्षा केंद्र आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. त्यात आता  परीक्षा केंद्रावर बॅग आणि मोबाईल ठेवण्यासाठी पैसे आकारल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. 

तलाठी भरती परीक्षेत विद्यार्थ्यांचाच गोंधल उडालाय. तलाठी भरती परीक्षा अर्ज भरताना आधीच विद्यार्थ्यांकडून 1 हजार रुपये अर्ज शुल्क घेण्यात आले होते.  राज्यात तलाठी पदाच्या एकूण 4 हजार 466 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी 11 लाख 10 हजार ५३ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. असे असताना विद्यार्थ्यांकडून परीक्षा केंद्रावर पैसे आकारले जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

छत्रपती संभाजीनगरात परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींकडून बॅगा ठेवण्याचे पैसे घेतल्याचा प्रकार घडला आहे. परीक्षा केंद्राबाहेर बॅगा ठेवण्यासाठी प्रत्येकी 10 रुपये घेत असल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला आहे. 

विद्यार्थ्यांना सकाळी साडे सात वाजता विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले होते. सकाळी 9 वाजल्यापासून परीक्षा सुरु होणार होता. दरम्यान अनेक केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्यानं परीक्षा खोळंबल्या होत्या. त्यानंतर पावणे अकरा वाजल्यापासून सर्व परीक्षा केंद्रावरील परीक्षा सुरु झाल्या. 

सकाळी 9 वाजताचा परीक्षेचा पेपर साधारण पावणे-अकराच्या सुमारास सुरु झाला  सकाळपासून बहुतांश जिल्ह्यात तलाठी भरती परीक्षेत गोंधळ उडाला होता. सर्व्हर डाऊन असल्यानं पुणे, नागपूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, अमरावतीत परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला होता. सकाळी 7.30 वाजता परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना केंद्रात घेण्यात आलं, मात्र सर्व्हर डाऊन झाल्यानं विद्यार्थी खोळंबले. सुमारे दोन तास सर्व्हरचा गोंधळ नीट होत नव्हता.. त्यामुळे परीक्षेआधीच विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

तलाठी भरती परीक्षेसाठी लातूरमध्येही मोठ्या संख्येने परीक्षा केंद्रावर उपस्थित होते. सकाळी नऊ वाजताचा पेपर होता. रिपोर्टींग टाईम सकाळी सातचा होता. परीक्षार्थी सकाळी सहा वाजल्यापासूनच केंद्रावर हजर होते. मात्र त्यांना उडावीउडवीच्या उत्तराला सामोरं जावं लागलं. पाहुया विद्यार्थ्यांची काय प्रतिक्रिया आहे.