'दाल में कुछ काला है या पुरी दालच काली है...' असं का म्हणाल्या सुषमा अंधारे

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मतदारसंघात आपल्या भाषणाला सुरुवात करत गुलाबराव पाटलांवर तोफ लावली आहे.

Updated: Nov 2, 2022, 10:14 PM IST
'दाल में कुछ काला है या पुरी दालच काली है...' असं का म्हणाल्या सुषमा अंधारे title=
Sushma Andhare will again attack Gulabrao Patil nz

वाल्मिकी जोशी, झी मीडिया, जळगाव - कालिया कहीं साप बदल लेते है, मतलब के लिये लोग बाप बदल लेते है, हा शेर सत्तांतराआधी गुलाबराव पाटील भाषणादरम्यान म्हणायचे मात्र हाच शेर म्हणत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मतदारसंघात आपल्या भाषणाला सुरुवात करत गुलाबराव पाटलांवर तोफ लावली आहे. सुषमा अंधारे नाव न घेता गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला आहे. (Sushma Andhare will again attack Gulabrao Patil nz)

हे ही वाचा - Andheri By Poll Election! अंधेरी परिसरात 1 नोव्हेंबरपासून 3 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी लागू

 

गुलाबराव पाटील भ्रष्टाचार

कोरोना काळात गुलाबराव पाटील यांच्या कारकीर्दीत व्हेंटिलेटर चा घोटाळा झाल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता. मात्र भाजपच्या लोकांचा किंवा भाजपचे निकटवर्तीय असलेल्या लोकांचा घोटाळा निघाला तर किरीट सोमय्या काहीही बोलत नाही, मात्र इतरांबद्दल तोच विषय ओढून ताणून आणला जातो. . त्यामुळे बीकेसी मेळाव्यासाठी जे तुम्ही दहा कोटी खर्च केले जर एखादा पक्ष रजिस्टर नसतानासुद्धा ते पैसे कुठून खर्च केले कोणाच्या खात्यातून खर्च केले. असे अनेक प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित करत भावना गवळी, प्रताप सरनाईक, आणि यशवंत जाधव यांच्यावर ई डी च्या नोटिसा दिल्या व चौकशा सुरू झाल्या. मात्र त्या चौकशा अचानक कशा थांबल्या असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा - भारत-बांगलादेश सामना आणि बिर्याणी, तंदूरीची पार्टी, सरकारी कार्यालयात रंगली पार्टी

 

ईडी स्वायत्ता संस्थेचा वापर...

ईडी स्वायत्ता संस्थेचा गैरवापर थांबला पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही महाप्रबोधन यात्रेतून करत असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. राणेंचा बंगला पाडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असताना सुद्धा त्या ठिकाणी किरीट सोमय्या अजून हातोडा घेऊन का गेलेले नाही, तसेच सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा शेतकऱ्यांचे पीक विम्याचे 531 कोटी रुपये अजूनही विमा कंपन्यांनी बँकांमध्ये का भरले नाही. याचाच अर्थ दाल में कुछ काला है या सभी दालच काली है , याचे उत्तर किरीट सोमय्या यांनी द्यावे असा थेट सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्या यांना विचारला आहे

हे ही वाचा - शिवसेना कार्यकर्त्यांनी उधळपट्टी केल्याचा VIDEO आला समोर 

 

सर्व आरोप गायब 

कालपर्यंत माफिया वाटणाऱ्या भावना गवळी आता मोदीजींना राखी बांधू शकतात. ज्या यशवंत जाधव यांच्या घरात दोन कोटींचं घड्याळ सापडलं बेनामी बे हिशोबी मालमत्ता सापडल्याचे किरीट सोमय्या म्हणत होते. म्हणजेच आधी मानसिक खच्चीकरण करायचं मग त्याला आपल्याकडे ओढायचं आणि सर्व आरोप विसरून जायचे. हे जे गौडबंगाल आहे हे भाजपा किरीट सोमय्या व देवेंद्र फडणवीस यांना असं वाटत असेल की, आपण जे करतोय हे फार अक्कल हुशारीने करतोय. हे लोकांच्या लक्षात येत नाहीये असं त्यांना वाटत असेल, तर हा त्यांचा फार मोठा गैरसमज असून ये पब्लिक है सब कुछ जानती है असा थेट निशानाही सुषमा यांनी साधला.