जळगाव : माजी मंत्री सुरेश जैन आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात निधीच्या मागणीवरून चांगलीच जुगलबंदी रंगली. निमित्त होतं जैन इरिगेशन कंपनीच्या माध्यमातून शहरातील महात्मा गांधी उद्यानाच्या पुनर्बांधणी तसंच लोकार्पण समारंभाचं.
तत्कालीन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात जिल्ह्यासाठी दोन हजार कोटी रुपये देण्याचं कबूल केलं होत ते येतील तेव्हा येतील परंतु मंत्री महाजन यांनी शहरासाठी शंभर कोटी रुपये निधी आणावा अशी अपेक्षा यावेळी सुरेश जैन यांनी व्यक्त केली.
जैनांचा बोलण्याचा रोख हा माजी मंत्री खडसेंवर होता. त्यावर गिरीश महाजन यांनी राजकीय मतभेद विसरून जनतेकरिता एक होऊन शहर विकासासाठी शंभर कोटींचा निधी मुख्यमंत्र्यांकडून आणेन असं आश्वासन यावेळी दिले.