Sunil Tatkare NCP Maharashtra State President : शपथ घेतलेल्या राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना पहिला मोठा झटका बसला आहे. शपथ घेतलेल्या 9 आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही कारवाई केली आहे. यानंतर आता अजित पवार गट देखील आक्रमक झाल्याचे दिसत आहे. जयंत पाटील यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन गछ्चंती करत सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांची राष्ट्रवादीचे नविन प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. जाहीर पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल यांनी सुनील तटकरे यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. आम्हीच राष्ट्रवादी, पक्ष आणि चिन्ह आमचाच असा दावा अजित पवार यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे संघटनात्मक धोरण प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले. संघटनात्मक दृष्टीने नियुक्त्या करण्यास सुरुवात करण्यात आल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. पक्षाच्या 21 जूनच्या कार्यक्रमामध्ये पक्षाने अधिकृत रीतीने राष्ट्रीय कार्यकारीणी अध्यक्षाची जबाबादारी दिली होती. सप्टेंबर 2022 मध्ये पक्षाच्या अधिवेशनमध्ये पक्षाच्या संघटनात्मक नियुक्ती मी जाहीर केल्या होत्या. यावेशळी जयंत पाटील यांच्यावर राष्ट्रवादी पक्षाच्या महाराष्ट्रा प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी दिली होती असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस आमचीच, पक्ष आणि चिन्ह आमच्याबरोबर आहे असं म्हणत अजित पवारांनी थेट शरद पवारांना आव्हान दिले. पक्ष आमचा, चिन्ह आमचा, बहुसंख्य आमदारही आमचे आहेत. यामुळे आता साहेबांनी आशीर्वाद देऊन टाकावा असं अजित पवार म्हणाले. शरद पवारांचे आदेश लागू नाहीत असं पटेलांनी सांगितलंय. आम्ही बहुमतानं निर्णय घेतल्याचं पटेल म्हणालेत. राष्ट्रवादी सत्तेत आलेय. ही एक प्रकारची गुरुदक्षिणा असल्याचे देखील ते म्हणाले.
जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्तता करण्यात येत आहे. जयंत पाटील यांना अधिकृतरित्या याबबात कळवलण्यात आले आहे. सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीचे नविन प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षातील सर्व संघटनात्मक पदांच्या नियुक्त्या या सुनील तटकरे मार्फत केल्या जातील. नियुक्त्यांबाबतचे सर्व अधिकार त्यांना देण्यात आल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. युवक प्रदेशाध्यक्षपदी सुरज चव्हाण तर महिला प्रदेशाध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली आहे.
पत्रकारांनी अजित पवार यांना त्यांच्यासह गलेलेल्या आमदारांचा आकडा विचारला असता आमदार असल्याशिवाय शपथ विधी झाला का? असा सवाल उपस्थित केला. त्यांनी त्यांचा आकडा जाहीर केला आहे का? आमच्याकडे आमदारांचे मोठे संख्या बळ आहे.