'तो' पुन्हा येतोय, नागरिकांनो सतर्क राहा !

 राज्यातल्या काही भागांत येत्या रविवारी आणि सोमवारी हलक्या स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता 

Updated: Dec 20, 2019, 10:04 AM IST
 'तो' पुन्हा येतोय, नागरिकांनो सतर्क राहा ! title=

मुंबई : मुंबई-पुणेकरांच्या भेटीसाठी पुन्हा एकदा पाऊस येणार आहे. राज्यातल्या काही भागांत येत्या रविवारी आणि सोमवारी हलक्या स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, रायगडसह, पुणे, सातारा जिल्ह्यात २२ आणि २३ डिसेंबरला हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या हवामान बदलामुळे हा पाऊस पडण्याचं भाकीत वर्तवलं गेलं आहे. 

यंदा झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीकं वाहून गेली. यामुळे भाजीपाल्यांचे दर देखील कडाडले. कांद्याने शंभरी पार केली. शेतकरी आत्महत्या आणि संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्द्याने राज्याचे राजकारण तापले.