काँग्रेस अध्यक्षांचा असाही 'बेशरमी' प्रताप, पहा नेमकं काय केलं?

परळीतील जनतेच्या रेशन कार्डात दुरुस्ती करण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी गेल्या काही दिवसांपासून तहसील कार्यालय गाठत आहेत.

Updated: Mar 29, 2022, 06:29 PM IST
काँग्रेस अध्यक्षांचा असाही 'बेशरमी' प्रताप, पहा नेमकं काय केलं?  title=

बीड : ही घटना आहे परळी तहसील कार्यालयातली. परळीतील जनतेच्या रेशन कार्डात दुरुस्ती करण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी गेल्या काही दिवसांपासून तहसील कार्यालय गाठत आहेत. मात्र, दर वेळी या पदाधिकाऱ्यांना गत सहा महिन्यांपासून डाटा एंट्री बंद असल्याचे सांगितले जात आहे.

पण, त्याचवेळी तहसील कार्यालयातील कर्मचारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या दारात जाऊन डाटा एन्ट्री करत असल्याचे या पदाधिकाऱ्यांना दिसले. हा प्रकार पाहून काँग्रेस शहर अध्यक्ष हानिफ बहादुर भाई संतप्त झाले. त्यांनी काही कार्यकर्ते सोबत घेतले आणि बेशरमचे झाड घेऊन थेट तहसील कार्यालय गाठलं. 

संतप्त शहर अध्यक्ष हानिफ बहादुर भाई यांनी नायब तहसीलदारांचं दालन गाठलं. त्यांनी नायब तहसीलदार यांना बेशरमचे झाड देण्याचा प्रयत्न केला. पण, त्या तहसीलदारांनी ते झाड घेण्यास विरोध केला. त्यावर हानिफ बहादुर भाई यांनी जबरदस्तीने ते बेशरमचे झाड त्या अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकले.

]

नायब तहसीलदार यांना काँग्रेस कार्यकर्ते बेशरमचे झाड देण्याचा प्रयत्न करत होते, तर तहसीलदार विरोध करत होते. अशातच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. आमच्यावर गुन्हे दाखल करा पण बेशरमीची भेट घ्या असं ते वारंवार म्हणत होते. अखेर खूप वेळ चाललेला हा ड्रामा कर्मचाऱ्यांच्या मध्यस्तीमुळे संपला.