डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मोर पुन्हा आकाशात झेप घेणार; पायावर यशस्वी शस्त्रक्रिया

वर्धा येथे एका जखमी मोराच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मोर पुन्हा एकदा आकाशी झेप घेवू शकतो. 

Updated: Oct 9, 2023, 10:35 PM IST
डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मोर पुन्हा आकाशात झेप घेणार; पायावर यशस्वी शस्त्रक्रिया title=

Sergury On Leg Peacock : डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मोर पुन्हा आकाशात झेप घेणार आहे. वर्ध्यात मोराच्या फ्रॅक्चर झालेल्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. वर्ध्यात प्रथमच डॉक्टरांनी मोराच्या पायात प्लेटचे प्रत्यारोपण केले. दीड तासांच्या परिश्रमानंतर शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मोर पुन्हा आपल्या पायावर उभ राहणार आहे. 

काही दिवसांपूर्वी काचनूर शिवारात चार वर्षांचा दुखापतग्रस्त मोर आढळला होता.त्याचा पाय फ्रॅक्चर होता. या मोराच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पिपल फॉर अ‍ॅनिमल्सच्या करुणाश्रमात मोराची देखभाल करण्यात येत आहे. यापूर्वी मोरांच्या फ्रॅक्चर पायामध्ये रॉड टाकण्याच्या शस्त्रक्रिया पार पडल्यात... वर्ध्यात अस्थिरोग तज्ज्ञांनी प्रथमच मोराच्या पायात प्लेट टाकत यशस्वी शस्त्रक्रिया केली. कमीत कमी वजनाची प्लेट वापरून ही शस्त्रक्रिया करण्यात आली. दीड महिन्यांत मोर उडू शकण्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला.

यापूर्वी देखील वर्ध्यातील स्टेशन फैल येथील सुरज गजभिये यांच्या घरासमोर जखमी अवस्थेत आढळला होता. त्यानंतर गजभिये यांनी पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत मोराला वनविभागाच्या स्वाधिन केलंय. सध्या पीपल्स फॉर ओनिमल्स याठिकाणी मोरावार उपचार करण्यात आले.  

मोरावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

लातूर शहराजवळ मळवटी रोड परिसरात एका मोरावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. काही युवकांनी मोराला कुत्र्याच्या तावडीतून सोडवलं. जखमी झालेल्या मोराला पक्षीमित्र असलेल्या मेहबूब चाचांकडे नेण्यात आलं. त्यांनी मोरावर प्रथमोपचार केले आणि वनविभागाला याबाबत कळवलं. मोरावर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करुन नंतर त्याला जंगलात सोडण्यात आले. 

कृत्रिमरित्या मोरांची पैदास

कृत्रिमरित्याही मोरांची पैदास करणं शक्य होणार आहे. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात पिंगोरी इथल्या इला ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ही किमया झालीये. महाराष्ट्र वनविभाग आणि इला फाउंडेशनच्या वतीनं हे सेंटर चालवण्यात येतं. अंडी उबवण केंद्रात प्रथमच लांडोरीच्या अंड्यांपासून चार मोरांच्या पिल्लांचा जन्म झाल्याची देशातील ही पहिलीच घटना आहे.