जंगली मांजरीच्या पायात रॉड टाकून यशस्वी शस्त्रक्रिया

वर्षभरानंतर पुन्हा सोडले जंगलात

Updated: Jan 10, 2022, 12:34 PM IST
जंगली मांजरीच्या पायात रॉड टाकून यशस्वी शस्त्रक्रिया title=

नागपूर - ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये वर्षभरापूर्वी अपघातात पाय जखमी झालेल्या  जंगली मांजरीवर रॉड टाकून यशस्वी शस्रक्रिया केल्यानंतर पुन्हा तिला तिच्या अधिवासात सोडण्यात आले आहे.  ही रानमांजर अतिशय सुखरूप जंगलातील आपल्या अधिवासात परतली आहे. रान मांजरीवरील अतिशय कठीण अशा शस्त्रक्रियेनंतर हे  मुळ अधिवासात परत गेल्याने ट्रान्झिट  ट्रीटमेंट सेंटरच्या कर्मचारी आणि डॉक्टरांना चेहऱ्यावर समाधान देणारा आनंद होता.

पेंच व्याघ्र प्रकल्प लगतच्या राष्ट्रीय महामार्ग 44 वर अनेक वन्यप्राणी जखमी होत असतात. वर्षभरापूर्वी म्हणजे डिसेंबर 2020 मध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पालगतच्या राष्ट्रीय महामार्ग वर अपघातात जखमी झालेला रान मांजर उपचारासाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला आणण्यात आले होते.अपघातात त्याच्या 3 पायाला गंभीर इजा झाली होती.एका पायाचे तर हाड तुटले होते. एक्स- रे(x- ray) अहवाला वरून ट्रीटमेंट सेन्टरचे डॉ. मयूर काटे, डॉ. सय्यद बिलाल अली ,असिस्टंट सिद्धांत मोरे व समीर नेवारे यांनी त्याच्या एका पायाची सर्जरी करत त्यात रॉड टाकला. रान मांजराने उपचाराला चांगला प्रतिसाद दिला. काही महिन्यात तुटलेले हाड पुन्हा जुळले की नाही याची तपासणी करण्यात आली. हाड जुळल्याचे दिसून आल्यानंतर पुन्हा एक छोटीशी शस्त्रक्रिया करून त्याच्या पायातील रॉड काढण्यात आले.अगोदर जंगली मांजराला छोट्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले. त्यानंतर त्याची चालण्याची क्षमता आणि पळण्याची क्षमता कशी आहे हे पाहण्यासाठी त्याला मोठ्या पिंजऱ्यात सोडण्यात आले. तिच्या हालचाली समाधानकारक दिसून आल्या. सर्व खात्री पटल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला जंगलात सोडवण्याच्या दृष्टिने प्रमाणपत्र दिले.तब्बल एक वर्षानंतर रान मांजरीला जंगलात सोडण्यात आले. 

वर्षभर बोनलेस चिकनचा पाहुणचार

उपचारादरम्यान  रान मांजर सहज अन्न खाता यावे यासाठी सुरवातीला द्रव्य स्वरूपात अन्न देण्यात आलं.पायाचे हाड कमजोर असल्याने अगदी छोट्या पिंजऱ्यात कमी हालचाल होईल या पद्धतीने त्याला बोनलेस चिकनचा पाहुणचार पार पडला. पुढे जनगलांत सोडायचे असल्याने जंगली मांजराला स्वतःचे अन्न स्वतःच शोधावे लागतील. यासाठी शिकार करून खाण्याची सवय तुटू नये म्हणून शक्कल लढवण्यात आली. यात त्याला मोठ्या पिंजऱ्यात ठेवून कोंबडीचा पाहुणचार देण्यात आला. शिकार करण्याची तुटलेली सवय लावण्यात आली. आरोग्यसेवा पूर्ण केल्यानंतर जंगली मांजराला जंगलात अधिवासात जगू शकेल याची खात्री करून सोडण्यात आले.