Subhash Desai on Shinde: ...तुमची दाढीच जाळून टाकू; CM एकनाथ शिंदेंबद्दल सुभाष देसाईंचं खळबळजनक विधान

Subhash Desai on Shinde: ठाकरे गटातील (Thackeray Faction) नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली असून दाढी जाळून टाकू असं खळबळजनक विधान केलं आहे. तुम्ही धनुष्यबाण (Bow and Araow) घेऊन आलात, तर आम्ही तुम्हाला मशालीने (Torch) पळवून लावू असा इशाराही त्यांनी दिला आहे.   

Updated: Feb 25, 2023, 04:43 PM IST
Subhash Desai on Shinde: ...तुमची दाढीच जाळून टाकू; CM एकनाथ शिंदेंबद्दल सुभाष देसाईंचं खळबळजनक विधान title=

Subhash Desai on Shinde: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण (Bow and Arrow) चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर दोन्ही गट पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने (Thackeray Faction) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली असून निर्णयाला आव्हान दिलं आहे. दुसरीकडे कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणुकीच्या (By-Election) निमित्ताने ठाकरे आणि शिंदे गटामध्ये (Shinde Faction) जोरदार वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी एक मोठं विधान केलं आहे. 

"धनुष्यबाण हे रामाच्या हातात शोभून दिसते, रावणाच्या नाही. तुम्ही धनुष्यबाण घेऊन आलात, तर आम्ही तुम्हाला मशालीने पळवून लावू. ती दाढीपण जाळून टाकू," असं विधान सुभाष देसाई यांनी केलं आहे. कुडाळ येथे आयोजित शिवगर्जना मेळाव्यात ते बोलत होते.

"हुकूमशाहीकडे चाललेली वाटचाल रोखणार"

आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीबद्दल विचारण्यात आलं असता सुभाष देसाई म्हणाले की, "नवी समीकरणं अख्या देशात जुळत आहेत. गैरभाजपा राज्यांचे सगळे मुख्यमंत्री, सगळे पक्ष एकत्र होत आहेत. इंदिरा गांधीच्या वेळेला जसा प्रकार झालेला तशाप्रकारे देश एकटवून हुकुमशाहीकडे चाललेली वाटचाल रोखणार". 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शुक्रवारी संध्याकाळी त्यांचं निवासस्थान मातोश्रीवर पोहोचले होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांनी चहापानासाठी निमंत्रित केलं होतं. या बैठकीत त्यांनी देशपातळीवर भाजपविरोधात विरोधकांची आघाडी उभारण्यासंबंधी चर्चा केल्याची माहिती आहे. अरविंद केजरीवाल यांनी यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना करोना काळात केलेल्या कामाचं कौतुक केलं. 

अरविंद केजरीवाल यांनी यावेळी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही भाष्य केलं. उद्धव ठाकरे वाघ आहेत असं ते यावेळी म्हणाले. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे पक्षचिन्ह गेलं असले तरी, राज्यातील जनता उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहे. ते वाघच आहेत असं अरविंद केजरीवालांनी सांगितलं. तसंच सुप्रीम कोर्टात न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.